Who is Zanai Bhosle Asha Bhosles : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले सध्या चर्चेत आहे. लवकरच ती एका मोठ्या ऐतिहासिक सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. जाणून घेऊया कोण आहे जनाई, तिचं शिक्षण, करिअर आणि कौटुंबिक पार्श्वभूमी.
जनाई भोसले एक गायिका, गीतकार आणि अभिनेत्री आहे. तिने लहान वयातच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. संगीत क्षेत्रात मोठं घराणं असूनही, जनाई स्वतःच्या मेहनतीने आणि टॅलेंटच्या जोरावर पुढे जात आहे.
27
जनाई भोसलेचं कुटुंब आणि शिक्षण
जनाईचा जन्म जानेवारी 2002 मध्ये मुंबईत झाला. तिचे वडील आनंद भोसले आणि आई अनुजा भोसले आहेत. तिला रंजय भोसले नावाचा एक भाऊसुद्धा आहे. जनाईने स्वित्झर्लंडमधील 'इन्स्टिट्यूट ले रोझी' (Institut Le Rosey) येथून शिक्षण घेतलं आहे.
37
'6 पॅक' बँडसोबत जनाई भोसलेचं खास नातं
जनाई भोसले 2016 मध्ये तयार झालेल्या भारताच्या पहिल्या ट्रान्सजेंडर बँड '6 पॅक'चा भाग होती. प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे, हा संदेश देणं या बँडचा उद्देश होता. जनाईने त्यांच्यासोबत 'हिल पोरी हिला' हे गाणंही गायलं आहे.
आशा भोसले नेहमीच जनाईसाठी सर्वात मोठी प्रेरणा राहिल्या आहेत. त्यांच्या गाण्याची शैली आणि आवाजातील बदलांनी जनाईला लहानपणापासूनच प्रभावित केलं. आजीच्या मार्गदर्शनाखालीच तिने परफॉर्मिंग आर्ट्समधील आवड जोपासली.
57
जनाई भोसलेची गाणी आणि म्युझिक करिअर
जनाई भोसलेने 'हिल पोरी हिला'च्या रिमिक्सशिवाय 'तेरा ही एहसास है' सारखी गाणी गायली आहेत. तिने 2020 मध्ये स्वतःचं यूट्यूब चॅनलही सुरू केलं. तिचा आवाज आणि परफॉर्मन्स वेगवेगळ्या पिढीतील लोकांना आवडतो.
67
जनाई एक यशस्वी बिझनेस वुमन
2017 मध्ये जनाई भोसलेने मुंबईच्या वांद्रे परिसरात ‘iAzure’ नावाचं ॲपल-ऑथराइज्ड स्टोअर सुरू केलं. या कार्यक्रमाला सचिन तेंडुलकरची मुलगी सारा आणि पत्नी अंजली तेंडुलकर यांनी हजेरी लावली होती. जनाईने यूकेमधील बर्मिंगहॅममध्ये एक डान्स शोसुद्धा केला आहे.
77
जनाई भोसलेची सिनेमात एन्ट्री आणि संगीताचा वारसा
जनाई भोसले लवकरच 'प्राइड ऑफ भारत - छत्रपती शिवाजी महाराज' या सिनेमात 'राणी सई बाईं'च्या भूमिकेत दिसणार आहे. संदीप सिंग दिग्दर्शित या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत ऋषभ शेट्टी दिसणार आहे. हा चित्रपट 2027 मध्ये प्रदर्शित होणार असून, जनाईचा हा पहिलाच चित्रपट असेल. याशिवाय, जनाई तिचे आजोबा आर. डी. बर्मन आणि आजी आशा भोसले यांचा संगीताचा वारसाही पुढे नेत आहे.