Shubhangi Atre : कोट्यवधींची मालकीण मराठमोळी 'अंगूरी भाभी' किती शिकलीय? जाणून घ्या सबकूछ

Published : Apr 11, 2026, 07:57 AM IST

Shubhangi Atre Birthday Special : टीव्हीची 'अंगूरी भाभी' म्हणून प्रसिद्ध असलेली शुभांगी अत्रे ४५ वर्षांची झाली आहे. तिचा जन्म ११ एप्रिल १९८१ रोजी इंदूरमध्ये झाला. लग्नानंतर तिने अभिनयात करिअरला सुरुवात केली, हे खूप कमी लोकांना माहीत आहे. 

PREV
15
२ वर्षांची असताना टीव्हीवर
टीव्हीची 'अंगूरी भाभी' म्हणजेच शुभांगी अत्रे आता ४५ वर्षांची झाली आहे. तिची मुलगी २ वर्षांची असताना तिने टीव्हीवर पदार्पण केलं. तिचा पती पियुष पुरे यांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला. मात्र, आता पियुष या जगात नाहीत.
25
एका एपिसोडसाठी ४०,००० रुपये

रिपोर्ट्सनुसार, शुभांगी अत्रेला तिच्या पहिल्या कामाचे २५०० रुपये मिळाले होते, जे तिने एका जाहिरातीतून कमावले होते. 'भाबीजी घर पर हैं' या शोमध्ये संधी मिळाल्यानंतर ती एका एपिसोडसाठी ४०,००० रुपये फी आकारू लागली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती सुमारे १५ कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.

35
पुण्यात झाले शिक्षण
'अंगूरी भाभी'च्या भूमिकेत शुभांगी अत्रेला पाहून ती इतकी शिकलेली असेल असं कुणाला वाटणार नाही. तिने मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (MBA) ही पदवी घेतली आहे. एमबीए केल्यानंतर तिने पुण्यातील एका ॲक्टिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि अभिनयाचे धडे गिरवले.
45
करिअरला सुरवात
शुभांगी अत्रेने तिच्या करिअरची सुरुवात एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की' या टीव्ही शोमधून केली. यानंतर ती 'कस्तुरी', 'कुमकुम', 'ये रिश्ता क्या कहलाता है', 'दो हंसों का जोड़ा', 'चिड़िया घर', 'भाबीजी घर पर हैं' यांसारख्या मालिकांमध्ये दिसली.
55
ग्लॅमरस भाभी

'अंगूरी भाभी' म्हणजेच शुभांगी अत्रे खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर नजर टाकल्यास तिचे अनेक ग्लॅमरस आणि स्टनिंग फोटो पाहायला मिळतील.

Read more Photos on

Recommended Stories