Aamir Khan Gauri Spratt : आमिर खान-गौरी स्प्राट लग्न करणार, कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्याची होणारी पत्नी

Published : Jul 04, 2026, 01:09 PM IST
Aamir Khan Wedding

सार

Aamir Khan Wedding : आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करणार आहे. तो लग्न करणारी असणारी गौरी बॉलिवूड किंवा सिनेसृष्टीतील नाही. कोट्यवधींची मालकीण असलेली कोण आहे गौरी? 

मुंबई : बॉलिवूड परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. आमिर त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्राटसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. मुंबईत त्याच्या घरीच तो एका छोटेखानी कार्यक्रमात ५ जुलै रोजी गौरीसोबत लग्न करणार आहे. अत्यंत साध्या पद्धतीने होणाऱ्या या लग्नात केवळ जवळचे कुटुंबिय आणि मित्र उपस्थित राहणार आहेत.

आमिर खान आणि किरण यांचं नातं तुटल्यानंतर आमिर खान गौरी स्प्राटसोबत रिलेशनशिपमध्ये होता. बराच काळ त्या दोघांचं नातं मीडिया तसंच सिनेइंडस्ट्रीत माहिती नव्हतं. अखेर आमिरने मार्च २०२५ मध्ये आपल्या ६०व्या वाढदिवशी पहिल्यांदा गौरीला सर्वांसमोर आणलं. आपली जोडीदार म्हणूनच त्याने त्याच्या वाढदिवशी तिची ओळख जगासमोर आणली. त्यानंतर गौरी आणि आमिरला अनेकदा एकत्र पाहण्यात आलं. आमिर खानशी लग्न करणारी गौरी स्प्राट नेमकी आहे तरी कोण? ती काय करते?

कोण आहे गौरी स्प्राट?

आमिर खान सिनेसृष्टीतील स्टार अभिनेता आहे. मात्र त्याची होणारी पत्नी सिनेइंडस्ट्रीतील नाही. ४७ वर्षीय गौरी बंगळुरू येथे राहणारी आहे. ती व्यावसायिक कुटुंबातील आहे. गौरीच्या आईचा बंगळुरूमध्ये मागील अनेक काळापासून सलॉन बिजनेस आहे. तर गौरीने फॅशन आणि ब्यूटी इंडस्ट्रीत काम केलं आहे. सध्या ती बिजनेस मॅनेजमेंटमध्ये काम करत असल्याची माहिती आहे. गौरीने उटीमधून तिचं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. तर लंडनमधून फॅशन डिझाइन आणि फोटोग्राफीचं शिक्षण घेतलं आहे.

गौरीचे वडील तमिळ ब्रिटीश आहेत, तर तिची आई रीता या पंजाबी आयरिश आहेत. गौरीचे आजोबा ब्रिटीश लेखक होते. आजोबा १९२० मध्ये भारतात आले होते. त्यानंतर संपूर्ण कुटुंब इथेच भारतात राहिलं.

गौरीची संपत्ती किती?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौरी कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे. तिची संपत्ती २५ कोटी असल्याची माहिती आहे. फॅशन, ब्यूटी आणि कुटुंबातील व्यवसायाशी संबंधीत तिचं काम आहे.

आमिर खान इंडस्ट्रीतील सर्वाधिक नेटवर्थ असलेल्या कलाकारांपैकी एक आहे. आमिर खानचं नेटवर्थ १८०० ते २००० कोटींदरम्यान आहे. प्रोडक्शन हाऊस, ब्राँड एंडोर्समेंट, इतर व्यवसायात आमिरची गुंतवणूक आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

शाहरुख खानच्या पत्रामुळं होम लोन भेटलं, श्रेयस तळपदेने दिली कबुली
नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा' सिनेमाची चर्चा, झळकणार हे कलाकार