ती भूत बनून आली आणि माझ्या डोक्यावरचे केस उडायला लागले, 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं मृत पत्नीबाबत केलं धक्कादायक विधान

Published : Oct 20, 2025, 05:00 PM IST

अभिनेता पराग त्यागीने त्याची मृत पत्नी शेफाली जरीवालाच्या निधनानंतरचा एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना, घरात शेफालीचा वावर जाणवत असून, कापूरचा वास आल्यानंतर भूत बनून प्रतिसाद दिल्याचे त्याने म्हटले आहे. 

PREV
16
ती भूत बनून आली आणि माझ्या डोक्यावरचे केस उडायला लागले, 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं मृत पत्नीबाबत केलं धक्कादायक विधान

शेफाली जरीवालाचे यावर्षी जून महिन्यात निधन झालं. तिच्या मृत्यूमुळे चाहत्यांना मोठ्या प्रमाणावर धक्का सहन करावा लागला. तिचे कुटुंब अजून दुःखातून सावरू शकलं नसून अभिनेत्रीचा नवरा पराग त्यागी हा या धक्यातून बाहेर आला नाही.

26
नवऱ्याला मेलेल्या बायकोचा घरात जाणवतो वावर

शेफालीच्या नवऱ्याला तिचा वावर घरात असल्याचा भास होतो आहे. त्याने तिच्या आठवणीत सोशल मीडियावर पोस्ट केल्या असून तो अजूनही दुःखात बुडालेला दिसून आला आहे.

36
एका पॉडकास्टमध्ये मत केलं व्यक्त

एका पॉडकास्टमध्ये त्यानं मत व्यक्त केलं आहे. त्यावेळी बोलताना तो म्हणतो की, शेफालीच्या मृत्यूनंतर अगदी एक महिन्यापासून त्याला घरात अलौकिक हालचाली जाणवत आहेत. तो म्हणाला की तो ही भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही.

46
परागला येत होती पत्नीची आठवण

त्यांना ही घटना आठवल्यानंतर त्याचे हात आणि पाय सुन्न पडतात. यावेळी बोलताना अभिनेत्याने सांगितलं की, शेफालीच्या मृत्यूनंतर तो एकटाच घरात बसून असायचा आणि नांतर बायकोच्या फोटोकडे पाहून तू मला सोडून का गेलीस असं विचारत बसायचा.

56
संध्याकाळी कापूरचा वास लागला यायला

संध्याकाळी या दरम्यान, खोलीत अचानक कापूरचा वास येऊ लागला. परागने स्पष्ट केले की शेफालीला कापूरचा वास खूप आवडायचा. ती संध्याकाळी जेव्हा जेव्हा दिवा लावायची तेव्हा ती नेहमीच डिफ्यूझरमध्ये कापूर टाकायची.

66
कापूरचा वास घेतल्यानंतर बायको तिथंच असल्याची नवऱ्याला झाली जाणीव

कापूरचा वास घेतल्यानंतर नवऱ्याला बायको तिथंच आसपास असल्याची जाणीव झाली. यावेळी बोलताना त्यानं बाबू तू येथे आहेस का असं विचारलं. त्यानंतर परागचे केस वाऱ्याने उडायला लागले.

Read more Photos on

Recommended Stories