
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान कायमच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतो. त्यानं दिग्दर्शित केलेल्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मुळे परत एकदा चर्चेत आला आहे. आर्यन खाननं दिग्दर्शित केलेल्या या सीरिजमध्ये चाहत्यांनी अनेक हाय-प्रोफाइल कॅमिओ पाहिले आहेत, जे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
या सिरीजमध्ये एका घटनेनं लक्ष वेधून घेतलं आहे. सीरिजच्या पहिल्या भागात आर्यन खानच्या वैयक्तिक आयुष्यातील एका घटनेचा उल्लेख करण्यात आला होता. 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या पहिल्या भागात आधारित, आर्यन खाननं 2021 मध्ये ड्रग्ज प्रकरणात अटक केलेल्या माजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर टीका केली आहे. कोणता सीन व्हायरल होत आहे यावेळी सोशल मीडियावर आर्यन खानच्या सिरीजमधला एक सिन व्हायरल होत आहे. शोमधला एक मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता लक्ष्य एका पार्टीला जातो. समीर वानखेडे यांच्यासारखा दिसणार एक पात्र या सिरीजमध्ये दाखवण्यात आलं आहे. पोलीस व्हॅन घेऊन या पात्राची एन्ट्री होते आणि पार्टीत छापा टाकतो. याशिवाय, तो 'सत्यमेव जयते'चा जयघोष करताना दिसत असतो.
समीर वानखेडे यावेळी सत्यमेव जयते नावाचा जयजयकार करत असतात. ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला अटक करण्यात आल्यामुळं त्यावेळी हे प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजलं होतं. यावेळी समीर वानखेडे यांना हा सीन पाहून ट्रोल करण्यात आलं आहे. त्यावेळी वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडेकर यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे.
क्रांती रेडेकर हि पोस्टमध्ये आपला नवरा समीरबद्दल बोलत असते. त्यामध्ये तिने समीर रेडकर एका ठिकाणी बोलतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी ज्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती तो कार्यक्रम ड्रग्सविरोधी मोहिमेबद्दलचा होता. या कार्यक्रमात समीर हा ड्रग्स किती वाईट आणि हानिकारक असतात हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे.
"अंमली पदार्थांचं व्यसन ही एक गंभीर समस्या आहे आणि त्याची खिल्ली उडवणं किंवा त्याकडे दुर्लक्ष करणं हे खूप धोकादायक आहे... समाजातील प्रत्येक व्यक्तीनं या समस्येचं गांभीर्य समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात होणारे मोठे दुष्परिणाम टाळता येतील..." असं क्रांती रेडकरने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
क्रांतीने यावेळी पतीचे कौतुक केलं आहे. ती लिहिते की, "चांगलं काम करत राहा @swankhede.irs, समाजासाठी तुमचं योगदान खूप मोठं आहे आणि आम्हाला सर्वांना तुमचा खूप अभिमान आहे. तुम्ही आठवड्याचे शेवटचे दिवस मजा करण्यात, सुट्टीमध्ये घालवू शकता, पण तुम्ही ड्रग्जविरोधी जागरूकता व्याख्यानं आणि कार्यक्रम आयोजित करणं निवडता. आम्ही सर्व तुमच्या आणि तुमच्या चळवळीच्या पाठीशी उभे आहोत..."