
अभिनेता विनीत कुमार सिंह आता खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. 'समक' (Samuk) नावाच्या एका साय-फाय एलियन सर्व्हायव्हल-ॲक्शन थ्रिलर सिनेमात विनीतची वर्णी लागली आहे. ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श यांच्या माहितीनुसार, सिनेमाच्या कथेत विनीतची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे आणि त्याचा अक्षय कुमारसोबत मोठा वाटा असेल.
विपुल अमृतलाल शाह हे त्यांच्या सनशाईन पिक्चर्स बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करत आहेत, तर कनिष्क वर्मा या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.
VIINEET KUMAR SIINGH JOINS AKSHAY KUMAR IN 'SAMUK'... #ViineetKumarSiingh has joined #AkshayKumar in #Samuk, the sci-fi alien survival-action thriller produced by Vipul Amrutlal Shah under the banner of Sunshine Pictures and directed by Kanishk Varma. Viineet will be seen in a… pic.twitter.com/eK82d6Px0K — taran adarsh (@taran_adarsh) September 11, 2026
सध्या 'समक' सिनेमाचं शूटिंग यूकेमध्ये सुरू आहे आणि हा सिनेमा २०२७ मध्ये थिएटरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. अक्षय कुमारने गेल्या महिन्यापासूनच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
या सिनेमाची निर्मिती विपुल अमृतलाल शाह आणि आशिन ए. शाह हे केप ऑफ गुड फिल्म्सच्या सहयोगाने करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून या प्रोजेक्टवर काम सुरू होतं.
निर्मात्यांनी अजून कथेबद्दल फारशी माहिती दिलेली नाही. पण 'समक' हा एक सर्व्हायव्हल थ्रिलर असेल, ज्यात मिलिटरी ॲक्शन, हॉरर आणि एलियनशी संबंधित रहस्यमय कथा पाहायला मिळेल. सिनेमात जबरदस्त ॲक्शन आणि स्पेशल क्रिएचर इफेक्ट्स असण्याचीही अपेक्षा आहे.
विनीत कुमार सिंहच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, 'समक' हा त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सपैकी एक आहे. याआधी तो 'छावा', 'जाट', 'सुपरबॉईज ऑफ मालेगाव', 'निशांची' आणि 'हॅलो बच्चों' यांसारख्या सिनेमांमध्ये दिसला आहे.
दुसरीकडे, अक्षय कुमारचा 'हैवान' हा सिनेमा सध्या थिएटरमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
'हैवान' सिनेमाची निर्मिती व्यंकट के. नारायण आणि शैलजा देसाई फेन यांनी केव्हीएन प्रॉडक्शन्स आणि थेस्पियन फिल्म्सच्या बॅनरखाली केली आहे. ११ सप्टेंबर रोजी हा सिनेमा जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून, याचं संगीत झी म्युझिक कंपनीने दिलं आहे. (एएनआय)