Nana Patekar Death : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, गोव्यात घेतला अखेरचा श्वास

Published : Oct 08, 2026, 08:17 AM IST
Nana Patekar Death : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, गोव्यात घेतला अखेरचा श्वास

सार

Nana Patekar : नाना पाटेकर यांचं निधन झालं आहे. गोव्यातील त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पणजी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील त्यांच्या घरी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर यांनी त्यांच्या वडिलांच्या निधनाचं वृत्त दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील मनिपाल रुग्णालयातील वैद्यकीय टीमने नाना पाटेकर यांना आज गुरुवारी पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी मृत घोषित केले. त्यांना छातीत तीव्र वेदना होत असल्याची तक्रार होती. त्यानंतर, त्यांच्या फ्लॅटवर एक वैद्यकीय पथक पाठवण्यात आलं होतं. मात्र वैद्यकीय पथक तिथे पोहोचल्यावर नाना बेशुद्ध अवस्थेत आढळले.

नाना पाटेकर हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव होतं. त्यांनी तब्बल ३ वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला होता. २०१३ मध्ये देशाने त्यांना 'पद्मश्री' पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Mithun Chakraborty: मिथुन चक्रवर्तींना पश्चिम बंगाल सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा
Kabir Bedi: वयाच्या ७० व्या वर्षी चौथ्यांदा बोहल्यावर चढला हा हँडसम व्हिलन, आता उलगडले लग्नाचे रहस्य