
अर्थशॉट पुरस्कार सोहळ्यात भूमी पेडणेकर यांनी हवामान बदलामुळे वाढणाऱ्या पूर आणि नैसर्गिक आपत्तींबाबत चिंता व्यक्त केली. भविष्यातील पिढ्यांसाठी पर्यावरण वाचवण्याचे आवाहन त्यांनी केले. तर सयानी गुप्ता यांनी मुंबई-दिल्लीतील प्रदूषण, वाढती बांधकामे आणि वृक्षतोडीवर नाराजी व्यक्त केली. स्वच्छ हवा हा प्रत्येकाचा अधिकार असल्याचे त्या म्हणाल्या.