
मुंबईत अभिनेते नाना पाटेकर यांच्या श्रद्धांजली सभेत तुकाराम मुंढे यांनी नानांच्या आठवणींना उजाळा दिला. 2015-16 मध्ये सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना झालेल्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून नानांनी दुष्काळग्रस्त शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची कुटुंबं आणि जलसंधारणासाठी केलेल्या कामाचं कौतुक केलं. शासकीय मदतीच्या निकषांत न बसणाऱ्या कुटुंबांना नानांनी प्राधान्याने मदत केल्याचं सांगितलं. काही दिवसांपूर्वी झालेल्या शेवटच्या फोनवरील ‘लव्ह यू बाळा’ हे नानांचे शब्द आठवताना मुंढे भावुक झाले. नानांचे मानवतेचे विचार पुढे नेणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असं त्यांनी म्हटलं.