विजय सेतुपतीच्या 'थलायवन थलायवी'ने केला 100 कोटींचा टप्पा पार, आताच एवढा निव्वळ नफा कमविला!

Published : Aug 25, 2025, 01:07 AM IST

विजय सेतुपतीचा 'थलायवन थलायवी' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर १०० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. निर्मात्यांनी अधिकृतपणे ही घोषणा केली आहे.

PREV
14
१०० कोटींचा टप्पा पार

'महाराजा'नंतर विजय सेतुपतीच्या 'थलायवन थलायवी'नं १०० कोटींचा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे केवळ ३३ कोटी रुपयांमध्ये हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. म्हणजे या चित्रपटाने तब्बल ६७ कोटींचा नफा आताच कमावला आहे. 

24
थलायवन थलायवी

कुटुंबकथेवर आधारित या चित्रपटात नवरा-बायको आणि सासू-सुनेच्या नात्याचं चित्रण आहे. अतिशय साधा आणि सोपा विषय, पण अतिशय सुरेख मांडणी या चित्रपटात दिसून येते.

34
विजय-नित्या

चित्रपटानं प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा मिळवत १०० कोटींचा टप्पा गाठला आहे. ही साधी, सरळ आणि सोपी कहाणी प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. 

44
१०० कोटी कमाई
'महाराजा'नंतर विजय सेतुपतीचा हा दुसरा चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे.
Read more Photos on

Recommended Stories