सलमान खान 'बिग बॉस'च्या १९ व्या सीझनमध्ये परतला आहेत. या सीझनसाठी त्याला चांगलीच फी मिळाली असल्याच्या बातम्या आहेत. पण, मागच्या दोन सीझनच्या तुलनेत ही फी कमी आहे. जाणून घ्या तो नेमके या शोसाठी किती फी घेतो…
रिपोर्ट्सनुसार, सलमान खानला 'बिग बॉस १९'च्या संपूर्ण सीझनसाठी १२० ते १५० कोटी रुपये मिळत आहेत. तो फक्त १५ आठवडे शो होस्ट करेल, म्हणजेच आठवड्याला ८ ते १० कोटी रुपये. शो ५ महिने चालेल आणि शेवटचे २ महिने फराह खान, करण जोहर आणि अनिल कपूर होस्ट करतील असे सांगितले जात आहे.
25
मागच्या सीझन्सपेक्षा कमी फी
मागच्या दोन सीझन 'बिग बॉस १७' आणि 'बिग बॉस १८'च्या तुलनेत सलमान खानच्या फीमध्ये घट झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, BB१८ मध्ये सलमानला संपूर्ण सीझनसाठी २५० कोटी रुपये आणि BB१७ मध्ये २०० कोटी रुपये मानधन मिळाले होते.
35
'बिग बॉस OTT २' पेक्षा जास्त फी
सलमान खानने 'बिग बॉस OTT'चा दुसरा सीझन होस्ट केला होता. त्यासाठी त्याला सुमारे ९६ कोटी रुपये मिळाले होते. या हिशोबाने 'बिग बॉस १९'मध्ये त्याला जास्त रक्कम मिळत आहे.
रिपोर्ट्सनुसार, 'बिग बॉस'च्या १६ व्या सीझनसाठी सलमान खानला सर्वाधिक फी मिळाली होती. त्याला संपूर्ण सीझनसाठी १००० कोटी रुपये मिळाले होते असे म्हटले जाते. मात्र, सलमान खानने स्वतः या अफवा फेटाळून लावल्या आहेत. "मला १००० कोटी रुपये मिळाले असते तर मी निवृत्त झालो असतो. पण आशा आहे की कधीतरी मी या टप्प्यावर पोहोचेन. तरीही माझे खर्च खूप जास्त आहेत. विशेषतः वकिलांची फी, जे स्वतः सलमान खानइतकेच महाग आहेत. खरं तर माझी संपूर्ण कमाईही या आकड्याच्या एक चतुर्थांश नाही. अशा प्रकारच्या रिपोर्ट्सवर आयकर आणि ईडीची बारकाईने नजर असते हे विसरू नका," असे त्याने एका निवेदनात म्हटले होते.
55
१३ ते १५ व्या सीझनची फी
रिपोर्ट्सनुसार, 'बिग बॉस १३'साठी सलमान खानची फी प्रति एपिसोड १५ कोटी रुपये होती. १४ व्या सीझनसाठी त्याने २० कोटी रुपये प्रति वीकेंड आकारले होते. तर १५ व्या सीझनसाठी त्याला २५ कोटी रुपये प्रति वीकेंड आणि संपूर्ण सीझनसाठी ३५० कोटी रुपये मिळाले होते.