सूरज चव्हाणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, 'स्वर्गीय शाहीर दादा कोंडके' यांच्या नावे मिळाला पुरस्कार

Published : Jun 03, 2025, 08:30 AM ISTUpdated : Jun 03, 2025, 08:33 AM IST
Suraj Chavan

सार

बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सूरजला स्वर्गीय शाहीर दादासाहेब कोंडके यांच्य नावे पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी सूरजने पुरस्कार घेताना म्हटले की, लय भारी वाटतंय…

Suraj Chavan Got Late Shahir Dada Kondke Award : सूरज चव्हाण हे नाव गेल्या काही महिन्यांपासून मराठी मनोरंजनसृष्टीत सतत चर्चेत आहे. एका खेडेगावात राहणारा साधा, भोळा आणि सामान्य घरातून आलेला सूरज, केवळ टिकटॉकवरील विनोदी आणि भावनिक व्हिडिओंमुळे प्रचंड लोकप्रिय झाला. या माध्यमातून त्याने चांगली कमाईसुद्धा केली, मात्र शिक्षणाचा अभाव आणि अनुभव नसल्याने त्याला अनेकदा फसवणुकीला सामोरे जावे लागले. त्यातच टिकटॉक भारतात बंद झाल्यावर सूरजची ओळख आणि लोकप्रियता झपाट्याने कमी झाली.

पण त्याचे नशीब बदलले बिग बॉस मराठी सारख्या मोठ्या रिअ‍ॅलिटी शोमुळे. जेव्हा प्रीमियर एपिसोडमध्ये सूरज स्पर्धक म्हणून समोर आला, तेव्हा काही प्रेक्षकांनी त्याला गांभीर्याने घेतले नाही. पण हळूहळू त्याच्या साधेपणाने, प्रामाणिक बोलण्याने आणि अनोख्या शैलीमुळे त्याची फॅन फॉलोविंग वाढत गेली. महाअंतिम फेरीत इंडियन आयडल विजेता अभिजीत सावंत सारख्या मातब्बर स्पर्धकाला मागे टाकून सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

या यशानंतर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरजसोबत सिनेमा बनवण्याची घोषणा केली. बिग बॉसमध्ये सूरज वारंवार वापरत असलेल्या “झापूक झुपूक” या शब्दांनी प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं होतं आणि त्यावरच आधारित चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. सिनेमाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसला तरी सूरजच्या अभिनयाचे आणि त्याच्या मेहनतीचे सर्वत्र कौतुक झाले.

आता सूरज चव्हाणच्या नावाशी अजून एक मानाचा तुरा जोडला गेला आहे. नुकतेच त्याला “स्वर्गीय शाहीर दादा कोंडके यांच्या नावाने पुरस्कार” देण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात सूरजला हा सन्मान प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर सूरजने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत लिहिले, "तुमच्या अख्यांच्या प्रेमामुळे मला दादा कोंडके यांच्या नावाने पुरस्कार मिळाला, लय भारी वाटतंय, असंच प्रेम राहू द्या." या कार्यक्रमाला त्याची बिग बॉस सहस्पर्धक जान्हवी किल्लेकरही उपस्थित होती.

 

 

याशिवाय सूरज चव्हाण एक खास व्हिडिओमुळे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने सोशल मीडियावर साखरपुडा झाला असा व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामुळे नेटकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. मात्र नंतर लक्षात आले की ती केवळ एक रील होती.सूरज चव्हाणचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे – अडचणींवर मात करून मेहनतीने यश संपादन करणाऱ्या नव्या पिढीचा हा आदर्श आहे.

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

अमिताभ बच्चन यांना दिल्ली हायकोर्टाचे समन्स, १६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
Sara Ali Khan Home : सारा अली खानच्या आलिशान घराचे खास फोटोज