चेन्नई - सुपरस्टार रजनीकांत यांचा कूली चित्रपट आज गुरुवारी प्रदर्शित होतोय. या निमित्त त्यांच्या होम मिनिस्टर लथा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्नीची प्रतिक्रिया ही त्यांच्या कामाची एक पावतीच असल्याचे बघितले जात आहे. जाणून घ्या वहिनी काय म्हणाल्या..
सुपरस्टार रजनीकांत यांचा 'कूली' चित्रपट जगभरात उद्या १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. १५, १६ आणि १७ ऑगस्ट रोजी सलग सुट्टी असल्याने १४ ऑगस्ट रोजी 'कूली' प्रदर्शित होत आहे. 'मास्टर', 'लियो', 'विक्रम' या चित्रपटांच्या मालिकेत दिग्दर्शक लोकेश कनगराज यांनी 'कूली'चे दिग्दर्शन केले आहे. पूर्णपणे अॅक्शन थ्रिलर प्रकारात बनवलेल्या या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत सत्यराज, उपेंद्र, नागार्जुन, सौबिन शाकिर, काली वेंकट, श्रुती हासन असे अनेक कलाकार आहेत.
23
४०० कोटी बजेट
'कूली' चित्रपटाला अनिरुद्ध यांनी संगीत दिले आहे. सन पिक्चर्सने ४०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवला आहे. चित्रपटाच्या प्री-बुकिंग आणि ओटीटी हक्कांमधून निर्मात्यांना ३०० कोटी रुपयांपर्यंत नफा झाला आहे, अशी माहिती समोर येत आहे. २०२५ मध्ये सर्वाधिक अपेक्षित चित्रपटांपैकी 'कूली' हा एक आहे. आतापर्यंत कोणत्याही कोलिवूड चित्रपटाने १००० कोटी रुपयांचा टप्पा गाठलेला नाही, पण सुपरस्टारचा 'कूली' हा विक्रम मोडेल अशी अपेक्षा आहे.
33
आमिर खान पाहुणा कलाकार
आमिर खान आणि पूजा हेगडे यांनी या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटातील 'मोनिका' हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून सर्वत्र गाजत आहे. 'कूली' उद्या प्रदर्शित होणार असताना, लता रजनीकांत यांनी चित्रपट पाहिला आणि त्यावर पहिला रिव्ह्यू दिला आहे. त्या म्हणाल्या, "रजनीकांत यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये 'कूली'चा समावेश होईल."