
अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर हे मनोरंजन विश्वातील सर्वात प्रसिद्ध जोडपं आहे. अलीकडेच सुत्रा यांनी मुलाखत दिली असून त्यामध्ये त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मुलखातीमध्ये त्यांनी विविध गोष्टींची माहिती दिली असून त्यामध्ये त्या काय म्हटल्या ते आपण जाणून घेऊयात.
'मी खरं सांगू तर, आयुष्यात मी काही ठरवलं नव्हतं. मी लहान असल्यापासून काम करत आले, आईवडिलांनी कधी मला अडवलं नव्हतं. नंतर जो माणूस काहीच करत नाही, अशा माणसावर प्रेम जडलं. आम्ही पळून जाऊन लग्न केलं आणि तेही ठरवलं नव्हतं. एका सकाळी मी आदेशला येऊन सांगितलं, आता माझ्या बाबांना समजलं आहे आणि आता ते माझं लगेच लग्न लावणार आहेत. तर आपण पळून जाऊया...
तो म्हणालेला की, बरी आहेस ना, मी तर पाच रुपये पण कमावत नाहीये.' सुचित्रा यांनी म्हटले की, त्यावेळी त्यांनी मग आदेश यांना न भेटण्याला सल्ला दिलेला. सुचित्रा यांच्यावरील प्रेमापोटी नातं तोडण्याचा विचारही शक्य नव्हता, असं सुचित्रा यांनी म्हटलं आहे. त्यांनी पुढं बोलताना सांगितलं की, 'तेव्हा मी 18 वर्षांची होते, तेव्हा आम्ही लग्न केलं. 10 ऑक्टोबरला मला 18 वर्ष पूर्ण झाले आणि 14 नोव्हेंबर रोजी बालदिनाला आम्ही लग्न केलं. मी तेव्हा 'कभी ये कभी वो' नावाची मालिका करत होते, त्यामुळे माझी कमाई बऱ्यापैकी होती, पण आदेशचा स्ट्रगल सुरू होता. लेडी लकमुळे त्यालाही छोटी-छोटी कामं मिळायला सुरुवात झाली.'
सुचित्रा यांनी म्हटलं आहे की, तेव्हा कामाची गरज होती त्यामुळे मी मी कामाच्या निवडीबाबत काटेकोर नव्हते. मला जे काम मिळालं ते मी काम करत गेलं. त्यांना हम हम पाँच या मालिकेतील पात्र लोकप्रिय होईल, अशीही खात्री नव्हती. त्यानंतर त्यांनी एकता कपूरच्या मालिकेत काम केलं होत. त्यावेळी मला उभा निवड करण्याची मुभा नव्हती. मला घर चालवायचं होतं. दोघांना मिळून संसार करायचा होता यामुळे मी येईल ते काम स्वीकारत गेले.