Vimal elaichi Ad : शाहरुख, अजय, टायगरला FDA ची नोटीस, विमल इलायची जाहिरातीसाठी किती चार्ज करतात?

Published : Aug 16, 2026, 04:08 PM IST
Shah Rukh Khan

सार

Vimal elaichi Ad Fee : बॉलिवूड किंग खान शाहरुख, अजय देवगण, टायगर श्रॉफ विमल इलायची याची जाहिरात करतात. त्यांना एफडीएने नोटीस पाठवली आहे. पण या जाहिरातीसाठी ते किती चार्ज करतात?

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रभरात अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) अनेक हॉटेल, रेस्टॉरेंट्सवर धाडी टाकल्या आहेत. आता FDA ने बॉलिवूड स्टार्सविरोधातही कारवाईचं पाऊल उचललं आहे. एफडीएने शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना 'विष्णू अँड कंपनी ट्रेडमार्क्स प्रायव्हेट लिमिटेड'द्वारे उत्पादित केल्या जाणाऱ्या 'विमल मसाला'च्या जाहिरातींबाबत नोटीस पाठवली आहे.

एफडीएने याबाबत बोलताना सांगितलं, की ही विमल इलायची या नावाने विकली जाणारी जाहिरात अप्रत्यक्षणे विमल पान मसाला या ब्रँडची जाहिरात केली जात आहे. ही जाहिरात म्हणजे ग्राहकांची दिशाभूल करण्याचं काम आहे. या जाहिरातीमुळे ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते.

मागील अनेक वर्षांपासून शाहरुख खान, अजय देवगन, टायगर श्रॉफ या विमल इलायचीच्या जाहिराती करत आहेत. बोलो जुबा केसरी... या टॅगलाइनखाली ही जाहिरात लोकप्रिय आहे. सुरुवातीच्या काळात केवळ अजय देवगन या जाहिरातीचा भाग होता. पण त्यानंतर शाहरुख आणि टायगर श्रॉफदेखील ही जाहिरात करू लागले.

बॉलिवूडचे बडे स्टार्स या जाहिरात करतात. आता त्यांना एफडीएने नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागवलं आहे. 'विमल इलायची'ची जाहिरात करण्यासाठी बॉलिवूड स्टार्स किती पैसे घेतात?

विमल इलायची जाहिरातीसाठी शाहरुख, अजय, टायगरचं मानधन किती?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान मोठ्या ब्रँडच्या जाहिरातीसाठी जवळपास ८ ते १२ कोटी दिवासचं मानधन घेतो किंवा कँपेननुसार चार्ज करतो. पण पान मसाला यासारख्या वादग्रस्त ब्रँडच्या कँपेनसाठी तो जवळपास २० ते ३० कोटी रुपये मानधन घेत असावा, अशी माहिती आहे.

अजय देवगणची विमल पान मसाला जाहिरातीसाठी फी किती?

अजय देवगण या जाहिरातीमध्ये अनेक वर्षांपासून आहे. अजय या जाहिरातीचा प्रमुख आणि जुना चेहरा आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या ब्रँडच्या कँपेनसाठी तो जवळपास १० ते १५ कोटी चार्ज करतो अशी माहिती आहे.

टायगर श्रॉफ

टायगर श्रॉफ या जाहिरातीसाठी ३ ते ५ कोटी घेत असल्याची माहिती आहे. या स्टार्सच्या या मानधनाचे आकडे हे प्रसारमाध्यमांतील आकड्यांवर आधारित आहेत.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Vidyut Jammwal Hollywood Debut : १५ मिनिटे श्वास रोखून धरला! हॉलिवूड पदार्पणातच विद्युतची कमाल
Vijay Deverakonda iPhone : पैसे असूनही विजय देवरकोंडा नवा आयफोन का घेत नाही?