सोशल मीडिया स्टार डॅनी पंडित चित्रपट झळकणार, सैराट रिंकूसोबत करणार काम

Published : Sep 09, 2025, 05:00 PM IST
danny pandit

सार

मराठी चित्रपटसृष्टीत 'थप्पा' हा भव्य चित्रपट लवकरच येणार आहे. वैदेही परशुरामी, रिंकू राजगुरू, सिद्धार्थ बोडके, गौरव मोरे, डॅनी पंडित, सखी गोखले आणि साईंकित कामत यांची चित्रपटात ड्रीम स्टारकास्ट आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत थप्पा हा भव्य आणि हटके हा चित्रपट आता लवकरच येणार आहे. हिंदी चित्रपटांना लाजवेल टक्कर देईल असा बिग बजेट, दमदार कथानक आणि ताकदीची कास्टिंग घेऊन हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. या चित्रपटामध्ये ड्रीम स्टारकास्ट असून त्याबद्दलची माहितीच आपण जाणून घेऊयात.

कोण आहे स्टारकास्ट? 

वैदेही परशुरामी, रिंकू राजगुरू , सिद्धार्थ बोडके , गौरव मोरे , डॅनी पंडित , सखी गोखले आणि साईंकित कामत हे लोकप्रिय आणि दमदार कलाकार एकत्र पडद्यावर झळकणार आहेत. या सर्व कलाकारांनी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करण्यात येणार आहे. नवे चेहरे, नवे जोडीदार असल्याने यात नवीन केमिस्ट्री पाहायला मिळेल, त्यामुळ हा अनुभव खऱ्या अर्थाने ताजा, वेगळा आणि थरारक ठरणार आहे.

निर्माते कोण आहेत? 

स्टुडिओ लक्स आणि फिफ्टी टू फ्रायडे निर्मित या चित्रपटाचे मेहुल शाह आणि अमित भानुशाली हे निर्माते आहेत. हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीमध्ये सर्वात मोठा चित्रपट ठरणार आहे. फिफ्टी टू फ्रायडेच्या सहयोगाने ‘मुंबई पुणे मुंबई’, ‘मुंबई पुणे मुंबई २’, ‘मुंबई पुणे मुंबई ३’, ‘गर्ल्स’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘स्माईल प्लीज’ असे अनेक सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

मेहुल शाह कशाचे निर्माते आहेत? 

‘फोटो प्रेम’ या मराठी चित्रपटाचे आणि ‘शिकायतें’ या हिंदी वेब सीरिजचे मेहुल शाह निर्माते आहेत. हा चित्रपट कशाच्या आधारावर आहे हे अजूनही समजलेले नाही. एखादी प्रेमकथा मांडणार का की, फसवणूक, सूड किंवा काहीतरी वेगळं रहस्य उलगडणार, हे अजून गुलदस्त्यातच आहे. प्रेक्षकांचे कुतुहूल या चित्रपटामुळे उत्सुकता जाणली आहे.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Saif Ali Khan : सैफ अली खानचा रॉकस्टार अवतार, बाल्कनीत वाजवली इलेक्ट्रिक गिटार
Prabhas Birthday : प्रभासच्या ४७ व्या वाढदिवशी चाहत्यांना डबल गिफ्ट, 'फौजी'चा टीझर आणि 'कल्की २' ची झलक