'रामायण'च्या टीझरमध्ये रावणाची झलक दाखवली, पण चेहरा लपवला. चेहरा न दिसताही रावण सोशल मीडियावर चर्चेत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, 'रामायण'मध्ये रावणाची भूमिका साऊथचा सुपरस्टार यश साकारत आहे.
25
2026 मध्ये 2 चित्रपटांमध्ये यश येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'रामायण'मध्ये रावणाची भूमिका करणारा सुपरस्टार यश 2026 मध्ये 2 सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्याचा पहिला सिनेमा 'टॉक्सिक' 4 जूनला रिलीज होईल, तर दुसरा सिनेमा 'रामायण' दिवाळीत रिलीज करण्याची योजना आहे.
35
'रामायण' टीझरचा मोठा धमाका
रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. सिनेमाबद्दलचे अपडेट्स वेळोवेळी समोर येत असतात. आता हनुमान जयंतीच्या दिवशी मेकर्सनी टीझर रिलीज करून मोठा धमाका केला आहे. लोक हा टीझर पुन्हा पुन्हा बघत आहेत. आतापर्यंत या टीझरला ७३ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
डायरेक्टर नितेश तिवारी यांचा 'रामायण' सिनेमा दोन भागांमध्ये रिलीज होईल. असं म्हटलं जातंय की, सिनेमाचा पहिला भाग पूर्ण झाला असून फक्त थोडं पोस्ट-प्रोडक्शनचं काम बाकी आहे. हा सिनेमा 2026 च्या दिवाळीत म्हणजेच 6 नोव्हेंबरला रिलीज केला जाईल. 4 हजार कोटी बजेट असलेल्या या सिनेमाचे प्रोड्युसर नमित मल्होत्रा आहेत.
55
रामायण चित्रपटाची स्टारकास्ट
'रामायण' सिनेमात रणबीर कपूर आणि साई पल्लवी मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत यश, सनी देओल, रवी दुबे, अरुण गोविल, अमिताभ बच्चन, इंदिरा कृष्णन, रकुल प्रीत सिंग, काजल अग्रवाल, लारा दत्ता, विवेक ओबेरॉय, मोहित रैना असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतील.
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.