बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणीच्या बरेली येथील घराबाहेर गोळीबार झाला आहे. पहाटे साडेचार वाजता दोन अज्ञात इसमांनी मोटरसायकलवरून येऊन चार-पाच फायरिंग केली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दिशा पाटणीच्या घराबाहेर गोळीबार, बहिणीने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गँगस्टर रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार गँगने केला हल्ला
अभिनेत्री दिशा पाटणीच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला आहे. तिची बहीण खुशबू पाटणी हिने अनिरुद्धाचार्य यांच्या वक्तव्याचा काही महिन्यांपूर्वी समाचार घेतला होता. त्याचा बदला म्हणून हा गोळीबार झाला आहे.
26
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणीच्या घराबाहेर गोळीबार
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणीच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला आहे. तिच्या बरेली येथील घराबाहेर ही धक्कादायक घटना घडली असून दिशा पटनीचे वडील, निवृत्त डिप्टी एसपी जगदीश पटनी येथे राहतात.
36
पहाटे साडेचार वाजता गोळीबार झाला
पहाटे साडेचार वाजता ही गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दोन अज्ञात इसम मोटरसायकलवरून आले आणि सिव्हिल लाईन्स परिसरातील घराच्या मुख्य दरवाजावर तसेच भिंतीवर चार-पाच फायरिंग केली.
46
या घटनेत जीवितहानी झाली नाही
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. गँगस्टर रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार गँगने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या गॅंगने यापूर्वी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.
56
दिशा पाटनीची बहीण खुशबू पाटनीने केलं होत वक्तव्य
दिशा पाटनीची बहीण खुशबू पाटनी हिने प्रेमानंदजी महाराज आणि अनिरुद्धाचार्य यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा बदला घेतल्याचा दावा केला. यासंदर्भातील पोस्ट फेसबुकवर टाकण्यात आली आहे.
66
संत आणि धर्माच्या विरोधात बोलणाऱ्यांना परिणाम भोगावा लागेल असा दिला संदेश
संत आणि धर्मांविरोधात बोलणाऱ्यांना परिणाम भोगावा लागेल, अशी उघड धमकीही दिली. काही महिन्यांपूर्वी खुशबू पाटणीने एक व्हिडीओ बनवला होता, त्यामध्ये तिने अनिरुद्ध महाराजांच्या वक्तव्याविरोधात टीका केली होती.