Shilpa Shetty Ganpati Visarjan : शिल्पा शेट्टीचा ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप

Published : Sep 16, 2026, 09:37 AM IST
Shilpa Shetty Ganpati Visarjan : शिल्पा शेट्टीचा ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप

सार

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मुंबईत आपल्या कुटुंबासोबत गणपती बाप्पाला निरोप दिला. यावेळी तिने मराठमोळ्या साडीत ढोल-ताशांच्या तालावर मनसोक्त डान्स केला. माजी खासदार नवनीत राणा यांनीही शिल्पाच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं.

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या कुटुंबासोबत मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचं विसर्जन केलं. यावेळी तिने बाप्पाची मनोभावे पूजा केली. माजी खासदार नवनीत राणा यांनीही शिल्पाच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतल्याचं पाहायला मिळालं.

शिल्पा दरवर्षी गणेशोत्सवात बाप्पाची घरी प्रतिष्ठापना करते. बाप्पाला निरोप देण्यापूर्वी तिने कुटुंबासोबत विधीवत पूजा केली. विसर्जनासाठी शिल्पाने खास मराठमोळा लूक केला होता. पिवळ्या आणि गुलाबी रंगाची साडी, त्यावर पिवळा ब्लाऊज, पारंपरिक दागिने आणि चंद्रकोर लावून तिने आपला लूक पूर्ण केला होता.

विसर्जन मिरवणुकीत शिल्पाने ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरला. कुटुंबासोबत बाप्पाला निरोप देताना ती या क्षणाचा मनसोक्त आनंद घेताना दिसली. शिल्पा दरवर्षी आपल्या कुटुंबासोबत गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करते, हा सण तिच्यासाठी नेहमीच खूप खास असतो.

शिल्पाचे आगामी प्रोजेक्ट्स

कामाच्या आघाडीवर बोलायचं तर, शिल्पा नुकतीच 'केडी: द डेव्हिल' या चित्रपटात दिसली होती. केव्हीएन प्रॉडक्शन अंतर्गत व्यंकट के नारायण यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा पिरियड ॲक्शन चित्रपट १९७० च्या दशकातील बंगळुरूमधील सत्य घटनांवर आधारित आहे. या चित्रपटात ध्रुव सर्जा मुख्य भूमिकेत असून, त्याच्यासोबत संजय दत्त, शिल्पा शेट्टी कुंद्रा, रमेश अरविंद, रेश्मा नानय्या आणि व्ही रविचंद्रन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय शिल्पाने नुकतंच 'माँ है ना' या कुकिंग रिॲलिटी शोचं सूत्रसंचालनही केलं आहे.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Anupama Parameswaran: लग्नाआधीच आई व्हायचीय! 'नटसार्वभौम' फेम अनुपमा परमेश्वरनने सांगितली मनातील इच्छा
Ravi Kishan Garba Video: रवी किशनचा भन्नाट गरबा डान्स व्हायरल, नेटकरी म्हणाले- 'हा तर नवा मीम!'