Shalmali Kholgade: शाल्मलीच्या आईने आंतरधर्मीय लग्नाआधी विचारला होता 'तो' खासगी प्रश्न, म्हणाली 'तुमचं... कसंय?'

vivek panmand   | ANI
Published : Aug 06, 2026, 03:46 PM IST
Shalmali Kholgade: शाल्मलीच्या आईने आंतरधर्मीय लग्नाआधी विचारला होता 'तो' खासगी प्रश्न, म्हणाली 'तुमचं... कसंय?'

सार

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका शाल्मली खोलगडेने तिच्या आंतरधर्मीय लग्नावर तिच्या आई-वडिलांची काय प्रतिक्रिया होती याचा खुलासा केला आहे. तिच्या आईने तिला एक असा प्रश्न विचारला, जो ऐकून तिलाही आश्चर्य वाटलं.

बॉलिवूडची पार्टी अँथम गर्ल म्हणून शाल्मली खोलगडेची ओळख आहे. 'बलम पिचकारी' ते 'लत लग गयी' पर्यंत तिने एकापेक्षा एक हिट गाणी दिली आहेत. पण तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, शाल्मलीने तिच्या आंतरधर्मीय लग्नावर घरच्यांची काय प्रतिक्रिया होती आणि त्यांनी तिला कोणते इंटरेस्टिंग प्रश्न विचारले होते, याचा खुलासा केला आहे.

शाल्मलीने सांगितला खासगी आयुष्यातील किस्सा

ह्यूमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत शाल्मलीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगितलं. ती म्हणाली, “मी त्या व्यक्तीच्या प्रेमात पडले. तो मुस्लिम होता, हा योगायोग होता. त्यामुळे मी एका मुस्लिम व्यक्तीशी लग्न केलं. हे इतकं सोपं होतं.” तिच्या आई-वडिलांची काय प्रतिक्रिया होती असं विचारल्यावर ती म्हणाली, “त्यांना फक्त तो माणूस म्हणून कसा आहे याची काळजी होती. त्यांनी मला दोन गोष्टी विचारल्या, ‘तू त्याच्यावर प्रेम करतेस का? तो तुझ्यावर प्रेम करतो का? तुम्हाला मुलं हवी आहेत का?’ मी म्हणाले, मला मुलं नको आहेत. मग त्यांनी विचारलं, ‘त्याला मुलं हवी आहेत का?’ मी म्हणाले, नाही. ते म्हणाले की, या एका गोष्टीवर तुमचं एकमत असणं खूप गरजेचं आहे. आणि ठराविक काळानंतर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत बोलून हे तपासलं पाहिजे की वेळेनुसार यात काही बदल झाला आहे का? आणि ‘तुमची सेक्स लाईफ कशी आहे?’ हा प्रश्न माझ्या आईने मला विचारला.”

शाल्मली पुढे म्हणाली की, आईचा हा प्रश्न ऐकून तिला सुरुवातीला थोडं आश्चर्य वाटलं, कारण अशा गोष्टींवर सहसा उघडपणे बोललं जात नाही. पण नंतर तिला समजलं की तिच्या आईला तिला यावर विचार करायला लावायचा होता, कारण एका “यशस्वी लग्नासाठी” या गोष्टी महत्त्वाच्या असतात.

शाल्मलीचं लग्न

शाल्मली खोलगडेने तिचा बॉयफ्रेंड फरहान शेखसोबत २२ नोव्हेंबर २०२१ रोजी लग्न केलं. ते दोघेही बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Netflix Chinese Dramas : नेटफ्लिक्सवरील टॉप ७ चायनीज ड्रामा, जे भारतीयांना खूप आवडतात
Jailer 2 Box Office: बॉक्स ऑफिसवर रजनीकांतची त्सुनामी! रिलीजआधीच 'जेलर 2' ची २१ कोटींची कमाई