Shah Rukh Khan LA Mansion : 8 हजार कोटींची संपत्ती, 300 कोटींचं घर; दिवसाला 2 लाख भाडं घेणारा सुपरस्टार कोण?

Published : Oct 23, 2026, 02:27 PM IST

हा भारतीय सुपरस्टार हजारो कोटींचा मालक आहे. सिनेमे आणि बिझनेसमधून तो कोट्यवधी रुपये कमवतो. पण तुम्हाला माहितीये का, हा सुपरस्टार स्वतःचं घर दिवसाला तब्बल २ लाख रुपयांना भाड्याने देतो. हा अभिनेता नेमका आहे तरी कोण?

PREV
13
दर महिन्याला तगडी कमाई

भारतीय सिनेसृष्टीत या सुपरस्टारइतका श्रीमंत दुसरा कोणीही नाही. तो हजारो कोटींचा मालक आहे. घराबाहेरच्या फक्त एका नेमप्लेटसाठी त्याने २० लाखांपेक्षा जास्त खर्च केलाय, यावरूनच त्याची लेव्हल समजते. सिनेमे आणि वेगवेगळ्या बिझनेसमधून तो बक्कळ पैसा कमवतो. या अभिनेत्याचं अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये तब्बल ३०० कोटी रुपयांचं एक आलिशान घर आहे. विशेष म्हणजे तो हे घर भाड्याने देतो आणि त्यातून दर महिन्याला तगडी कमाई करतो. या घराचं एका दिवसाचं भाडं २ लाखांपेक्षा जास्त आहे. हा सुपरस्टार दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आहे.

23
भारतीय सिनेसृष्टीतील श्रीमंत अभिनेता

शाहरुख खान हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात श्रीमंत अभिनेता आहे. जगभरात त्याचे कोट्यवधी चाहते आहेत. सिनेमांसोबतच आयपीएल टीम आणि इतर व्यवसायांमधून त्याने हजारो कोटींचं साम्राज्य उभं केलंय. मुंबईतील त्याच्या 'मन्नत' बंगल्याबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण परदेशातही शाहरुखच्या अनेक महागड्या प्रॉपर्टीज आहेत. अमेरिकेतील सर्वात महागड्या 'बेव्हरली हिल्स' (Beverly Hills) भागात त्याचा हा ३०० कोटींचा बंगला आहे.

अमेरिकेतील ३०० कोटींचा बंगला

या आलिशान बंगल्यात ६ मोठे बेडरूम्स, सुंदर स्विमिंग पूल, प्रायव्हेट कबाना आणि खेळण्यासाठी एक खास टेनिस कोर्ट सुद्धा आहे.

33
बंगला भाड्यानेही दिला जातो

या बंगल्याचं इंटिरिअर डिझाईन एखाद्या राजवाड्यासारखं आहे. हॉलमधील मोठ्या सिटिंग एरियामधून बाहेरचा निसर्ग पाहता यावा, यासाठी आजूबाजूला ग्लास फिटिंग्ज बसवले आहेत. स्टायलिश सोफा सेट, राजेशाही वाटतील असे वॉल पेंटिंग्ज, महागडे शोपीस आणि खास लायटिंगमुळे या घराचं सौंदर्य आणखी वाढतं. इथले बाथरूम्स सुद्धा एखाद्या मोठ्या बेडरूमइतके प्रशस्त आहेत आणि त्यात जकूझी (Jacuzzi) सारख्या अत्याधुनिक सुविधा आहेत.

शाहरुख खान हा बंगला फक्त स्वतःच्या सुट्ट्यांसाठी वापरत नाही, तर तो भाड्यानेही देतो. जगभरातील व्हीआयपी लोक किंवा पर्यटक दिवसाला २ लाख रुपये मोजून इथे राहण्यासाठी येतात. हजारो कोटींची संपत्ती असूनही परदेशातील प्रॉपर्टी भाड्याने देऊन त्यातून बिझनेस करण्याची शाहरुखची ही स्टाईल खरंच थक्क करणारी आहे.

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories