Sanju Rathod Dhamaal-4 : संजू राठोडचं बॉलिवूड गाणं तुफान व्हायरल, 'गुलाबी साडी' नव्या रुपात, ऐकलं का?

Published : Jul 13, 2026, 11:31 PM IST
Sanju Rathod Dhamaal-4 Saree Song

सार

Sanju Rathod Dhamaal-4 Saree Song : संजू राठोडचं सुपरहिट गाणं गुलाबी साडी घराघरात पोहोचलं. आता हे गाणं नव्या रुपात रिलीज झालं आहे. रितेश देशमुखचं धमाल-४ या सिनेमातील संजू राठोडचं गाणं लोकप्रिय झालं आहे.

मुंबई : गायक संजू राठोड याचं गुलाबी साडी गाणं तुफान गाजलं. हे गाणं समोर आल्यानंतर सोशल मीडियावर या गाण्याची तुफान क्रेझ पाहायला मिळाली, अनेकांच्या रिल, सोशल मीडियावर हेच गाणं वाजत होतं. या गाण्यामुळेच संजू राठोड घराघरात पोहोचला. त्यानंतर आता संजू राठोड थेट बॉलिवूडमध्ये पोहोचला आहे. गुलाबी साडी हे गाणं पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. नुकताच रिलीज झालेला धमाल-४ या बॉलिवूड सिनेमात संजू राठोडचं एक गाणं आहे. संजूने धमाल-४ सिनेमात साडी हे नवं गाणं गायलं आहे. धमाल-४ च्या दिग्दर्शकांनी सिनेमातील तिसरं गाणं संजू राठोडचं प्रदर्शित केलं. या नव्या गाण्याचं नाव साडी असं आहे. हे गाणं संजू राठोडच्या मराठी गुलाबी साडी गाण्याचं नवं व्हर्जन आहे. या गाण्यात रितेश देशमुख, अजय देवगण अशी स्टारकास्ट थिरकताना दिसत आहेत.

धमाल-४ हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात सुरुवातीला चटणी आणि कहर ही दोन गाणी प्रदर्शित झाली होती. त्यानंतर तिसरं गाणं साडी हे रिलीज करण्यात आलं होतं. हे गाणं संजू राठोडने गायलं आहे. तर या गाण्याचे शब्द, बोल हे गायक कुमार आणि संजू राठोड दोघांनी लिहिले आहेत.

धमाल-४ सिनेमातील या साडी गाण्यात रितेश देशमुख आणि अंजली आनंद या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली आहे. त्याशिवाय गाण्यामध्ये अजय देवगण, ईशा गुप्ता आणि स्वत: संजू राठोड दिसतो आहे.

या गाण्याबाबत संजू राठोडने त्याची प्रतिक्रिया दिली होती. याबाबत बोलताना त्याने सांगितलं, की 'मला ज्यावेळी धमाल-४ या सिनेमाच्या दिग्दर्शकांनी साडी हे गाणं गाण्यासाठी विचारलं, त्यावेळी मला अतिशय आनंद झाला होता. हे गाणं गाण्यासाठी मी अत्यंत उत्साही होतो. धमाल या सिनेमाची सीरिज अतिशय लोकप्रिय आहे. या सिनेमासह जोडणं, सिनेमातील कलाकारांसह काम करणं ही बाब माझ्यासाठी अतिशय खास आहे. लोकांनी आतापर्यंत माझ्या गाण्यावर जे प्रेम दिलं आहे ते अतिशय खास आहे'.

धमाल-४ सिनेमा गुलशन कुमार आणि टी-सीरिजने अजय देवगनसोबत रिलीज केला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक इंद्र कुमार आहेत. तर या सिनेमाची अजय देवगन, भूषण कुमार, कृष्ण कुमार, अशोक ठकेरिया, आनंद पंडित, कुमार मंगत पाठक यांनी निर्मिती केली आहे.

सिनेमात रितेश देशमुख, अजय देवगण, ईशा गुप्तासह अर्शद वारसी, संजय मिश्रा, रवी किशन, जावेद जाफ्री, अंजली आनंद, संजीदा शेख, उपेंद्र लिमये अशी तगडी स्टारकास्ट एकत्रित धमाल करताना दिसते आहे. धमाल-४ सिनेमा १० जुलै रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Rajinikanth Charity Promise: 'कुटुंबाला एक पैसाही देणार नाही', हॉटेलच्या चर्चेदरम्यान रजनीकांत यांचा जुना व्हिडिओ व्हायरल
Tiger Shroff Firing: टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, बिश्नोई गँगची सलमान खानच्या मित्रांना धमकी