
मुंबई (महाराष्ट्र) [एएनआय], 27 नोव्हेंबर (एएनआय): प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाने इतिहास रचला आहे. युट्युब चॅनेल मेंबरशिपमध्ये जगभरात 1 दशलक्ष (10 लाख) मेंबर्सचा टप्पा गाठणारा तो पहिला क्रिएटर ठरला आहे. युट्युपने गुगल इंडिया ब्लॉगवरील एका पोस्टमध्ये या विक्रमाला दुजोरा दिला. त्यांनी समयच्या या यशाचे आणि प्रेक्षकांसोबतच्या त्याच्या मजबूत नात्याचे कौतुक केले. "समयसाठी हा एक असामान्य टप्पा आहे आणि भारताच्या क्रिएटर इकोसिस्टमसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. अभिनंदन, समय! आता पुढे तू कोणती भन्नाट आणि धमाकेदार संकल्पना घेऊन येशील याची आम्ही वाट पाहत आहोत," असे युट्युबने म्हटले आहे.
समय रैनाचा इथवरचा प्रवास सगळ्यांनाच माहीत आहे. त्याने कॉमेडियन म्हणून सुरुवात केली आणि नंतर युट्युबवर चेस स्ट्रीमिंग सुरू केले. केवळ जोक्सवर न थांबता, समयने 'इंडियाज गॉट लेटेंट' (India's Got Latent) या हिट शोमधून कंटेंट क्रिएशनची एक नवीन पातळी गाठली. पण या काश्मिरी जन्मलेल्या कॉमेडियनचा इथवरचा प्रवास सोपा नव्हता. त्याचा लोकप्रिय शो 'इंडियाज गॉट लेटेंट' वादात सापडला. पॉडकास्टर रणवीर अल्लाहबादियाने या शोमध्ये पालकांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यानंतर मोठा वाद उफाळून आला, समय रैना आणि सह-पॅनेलिस्टवर अनेक पोलीस तक्रारी आणि एफआयआर दाखल झाले. परिणामी, 2025 मध्ये युट्युबवरून सीझन 1 चे एपिसोड्स काढून टाकण्यात आले. पण त्यानंतर, 2026 मध्ये त्याने 'स्टिल अलाइव्ह' (Still Alive) या स्टँड-अप स्पेशलद्वारे जबरदस्त पुनरागमन केले. त्याने या कठीण काळावर भाष्य करत पुन्हा प्रेक्षकांची मने जिंकली, ज्यामुळे त्याचे शोज हाऊसफुल्ल झाले आणि युट्युबवर लाखो व्ह्यूज मिळाले. प्रेक्षकांच्या प्रचंड मागणीनंतर, या वर्षी त्याने 'इंडियाज गॉट लेटेंट'चा दुसरा सीझन आणला. यात आलिया भट्ट, वरुण धवन, राघव जुयाल यांसारखे बॉलीवूड स्टार्स दिसले. (एएनआय)