Salman Khan : 'पेपर लीक करून पास व्हायचा', सलमानचा जुना Video व्हायरल

Published : Jul 24, 2026, 02:23 PM IST
Salman Khan : 'पेपर लीक करून पास व्हायचा', सलमानचा जुना Video व्हायरल

सार

Salman Khan Paper Leak Old Video Viral : NEET पेपरफुटी प्रकरणात सलमान खानने प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर त्याचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सलमानच्या शाळेतील पेपरफुटीबद्दल एक किस्सा त्याच्या वडिलांकडूनच सांगितला जात आहे.

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांना पाठिंबा देणारी सोशल मीडिया पोस्ट केल्यानंतर अभिनेता सलमान खानचा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 'द कपिल शर्मा शो'मधील आहे, जिथे सलमान त्याचे वडील सलीम खान आणि भाऊ अरबाज आणि सोहेल खान यांच्यासोबत आला होता. याच शोमध्ये बोलताना सलीम खान यांनी सलमानच्या शाळेतील दिवसांमधला एक किस्सा सांगितला. ज्यात परीक्षेचे पेपर फुटल्याचा उल्लेख आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आहे. काही जण सलमानची बाजू घेत आहेत, तर अनेक युजर्स यावरून त्याला प्रश्न विचारत आहेत.

व्हिडिओमध्ये सलीम खान यांनी काय सांगितलं?

या व्हायरल व्हिडिओमध्ये सलीम खान सांगतात की, त्यांच्या घरी गणेश नावाच्या एका व्यक्तीला खूप मान होता. नंतर त्यांना कळालं की तोच व्यक्ती सलमानसाठी शाळेच्या परीक्षेचे फुटलेले पेपर आणायचा. सलीम खान म्हणाले, 'आमच्या घरात गणेश नावाच्या मुलाचा सर्वात जास्त मान होती, कारण जेव्हा पेपर लीक व्हायचे तेव्हा तो सलमानसाठी ते घेऊन यायचा.' हे ऐकून सलमान खानसुद्धा हसताना दिसतो आणि फुटलेल्या पेपरमुळे काही परीक्षा पास झाल्याचं एकप्रकारे मान्य करतो. यावेळी कपिल शर्मा, प्रेक्षक आणि संपूर्ण खान कुटुंब हसताना दिसत आहे.

 

 

सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया?

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही युजर्सचं म्हणणं आहे की, हा शाळेच्या परीक्षेचा जुना किस्सा होता, त्याची तुलना NEET सारख्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेसोबत केली जाऊ शकत नाही. तर दुसरीकडे, अनेक जणांनी सलमानवर टीका केली आहे. एका युजरने लिहिलं, 'म्हणूनच तो या मुद्द्याला पाठिंबा देत आहे, कारण त्याने स्वतः हे अनुभवलं आहे.' दुसऱ्या युजरने लिहिलं, 'बॉलिवूडमधील बहुतेक लोक या विषयावर बोलण्याच्या लायकीचे नाहीत. त्यांनी विद्यार्थ्यांची मेहनत पाहिलेली नाही.' आणखी एकाने गंमतीत लिहिलंय, 'प्रत्येक नव्या वादावर लोक जुने व्हिडिओ शोधून कसे काढतात यार?' तर एका कमेंटमध्ये 'सेलिब्रिटी आणि त्यांचा दुटप्पीपणा,' असं म्हटलं आहे.

दिल्लीती विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सलमान खान काय म्हणाला?

सलमान खानने त्याच्या लहानपणीचा शाळेच्या गणवेशातील एक फोटो शेअर करत लिहिलं की, पेपर लीक होणं हे खूप गंभीर प्रकरण आहे. सलमान म्हणाला की, ही लढाई विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेमधील आहे आणि याला राजकीय रंग देऊ नये. त्याने लिहिलं, 'हा मुद्दा विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेमधील आहे. याला राजकीय फायद्यासाठी वापरू नये. याचं श्रेय फक्त आपल्या देशातील विद्यार्थ्यांनाच मिळायला हवं. मला पूर्ण विश्वास आहे की सरकारही त्यांना साथ देईल आणि शिक्षण व्यवस्था अधिक मजबूत करेल.'

PREV
Read more Articles on

Recommended Stories

सलमानचा आंदोलनावरून यू-टर्न, नेमकं काय म्हणाला?
सोशल मीडिया ट्रेंडमुळ मिळाली नॅशनल क्रश ओळख, गिरीजा ओक काय म्हणाली?