
'रामायण' चित्रपटाच्या मेकर्सनी शनिवारी मुंबईत एका ग्रँड इव्हेंटचं आयोजन केलं होतं. या खास कार्यक्रमात रणबीर कपूर, रवी दुबे, साई पल्लवी आणि दिग्दर्शक नितेश तिवारी एकत्र आले. पण या सगळ्यात भाव खाऊन गेला तो अमेरिकन युट्यूबर मिस्टर बीस्ट. त्याच्या सरप्राईज एन्ट्रीने इव्हेंटची रंगत आणखी वाढवली. रणबीर आणि निर्माता नमित मल्होत्रा यांनी मिस्टर बीस्टसोबत फोटोही काढले, जे पाहून चाहते चांगलेच एक्सायटेड झाले आहेत.
नितेश तिवारी दिग्दर्शित या 'रामायण'मध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर साई पल्लवी सीतेच्या, यश रावणाच्या, सनी देओल हनुमानाच्या आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत आहे. लक्ष्मणाची भूमिका साकारण्याबद्दल रवीने नुकतीच एएनआय (ANI) शी बोलताना आपली भावना व्यक्त केली. तो म्हणाला, "मी खूप उत्सुक आहे, पण त्यासोबतच एक प्रकारची शरणागतीही आहे. जेव्हा जेव्हा मी या चित्रपटाचा किंवा रामायणाचा विचार करतो, तेव्हा माझ्या मनात फक्त एकच भावना येते, ती म्हणजे पूर्णपणे शरण जाण्याची."
या भव्य चित्रपटाची निर्मिती नमित मल्होत्रा यांच्या 'प्राईम फोकस स्टुडिओज', आठ वेळा ऑस्कर जिंकणाऱ्या 'DNEG' आणि यशच्या 'मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स'ने मिळून केली आहे. तर सोनी पिक्चर्स (Sony Pictures) या चित्रपटाचं जगभरात (भारताबाहेर) वितरण करणार आहे. 'रामायण पार्ट वन' २०२६ च्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
(हेडलाईन वगळता, या बातमीत एशियननेट न्यूजच्या इंग्रजी टीमने कोणताही बदल केलेला नाही आणि ती सिंडिकेटेड फीडमधून प्रकाशित केली आहे.)