
मुंबई : राखी सावंतचा आणखी एक भन्नाट व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. राखी तिच्या बिनधास्त बोलण्यासाठी आणि अतरंगी स्टाईलसाठी ओळखली जाते. ती कधी काय करेल याचा काही नेम नसतो. तिचे कपडे असोत किंवा एखाद्या सामाजिक प्रश्नावर आवाज उठवणं असो, राखी नेहमीच चर्चेत असते.
आता पुन्हा एकदा ती मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. तिने हिरव्या रंगाचा मस्त लाउंजवेअर घातला होता. पापाराझींसोबत पोझ देताना आणि गप्पा मारताना तिचं लक्ष एका महिलेकडे गेलं. ती महिला मागून राखीचे फोटो काढत होती. हे पाहताच राखीने तिला लगेच हटकलं. ती म्हणाली, “तू मागून कोणता कॅमेरा लावलाय? हे कसले फोटो काढतेयस तू?” त्यावर एका पापाराझीने म्हटलं, “भाईने (सलमान खानने) मनाई केली आहे.” यावर राखीनेही दुजोरा देत सांगितलं, “हो, भाईने मनाई केली आहे ना, सलमान भाईने. फक्त पुढून फोटो काढायचे, मागून नाही.”
या व्हिडीओवर एका युजरने लिहिलंय, “सकाळची सुरुवात या पहिल्या रीलने झाली.” दुसऱ्याने म्हटलंय, “ती नेहमी योग्य गोष्टीला सपोर्ट करते.” आणखी एकाने लिहिलं, “भाई लाईक करा.” तर एकाने गमतीत म्हटलंय, “पुढून पण काढू नकोस.”
'वीकेंड का वार'मध्ये सलमान खानने अभिनेत्रींचे चुकीच्या अँगलने फोटो काढणाऱ्या पापाराझींची चांगलीच शाळा घेतली होती. तसंच, प्रेग्नन्सीनंतर वजन वाढल्यामुळे कतरिना कैफला ट्रोल करणाऱ्यांनाही सलमानने खडेबोल सुनावले होते.