पिंजरा फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन, घोडे आणि हत्ती यांच्यात केला होता डान्स

Published : Oct 04, 2025, 03:23 PM IST
sandhya shantaram heroine

सार

'पिंजरा' या अजरामर चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री संध्या शांताराम यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले आहे. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ही दुःखद बातमी दिली. 

एखाद्याला विचारलं की कोणता मराठी सिनेमा आवर्जून पाहायला हवा तर तो पिंजरा या चित्रपटाचा नाव आवर्जून सांगेल. या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन झालं आहे. त्या ८७ वर्षांच्या होत्या. संध्या यांचा पिंजरा या चित्रपटातील अभिनय पाहिल्यावर आपण त्यांना सलाम केल्याशिवाय राहणार नाही .

आशिष शेलार यांनी ट्विट करून दिली माहिती 

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘पिंजरा’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मानावर एक वेगळी छाप पाडली. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’ आणि विशेषत: ‘पिंजरा’ चित्रपटामधील त्यांची अजरामर भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो !

हत्ती आणि घोडे यांच्यात केला डान्स 

अभिनेत्रींच्या निधनाने सिनेमासृष्टीमध्ये एक पोकळी तयार झाली आहे. १९५९ मध्ये संध्या यांनी व्ही शांताराम यांच्या नवरंग सिनेमातून संध्या यांनी स्वतःला अभिनय क्षेत्रात सिद्ध करून दाखवलं होतं. संध्या शांताराम, यांचे खरे नाव विजया देशमुख होते, अरे जा रे हट नटखट या गाण्यासाठी त्या विशेषतः शास्त्रीय नृत्य शिकल्या. खरे घोडे आणि हत्ती यांच्यात संध्या या बेफान होऊन नाचत होत्या.

प्राण्यांमुळे न घाबरता संध्या यांनी डान्स करून दाखवला. त्यांनी स्वतःच्या डबल रोलला यामध्ये काम करण्याची गरज वाटू दिली नाही. त्यांनी हत्ती आणि घोडयांना स्वतःच्या हाताने केळी खायला देऊन पाणी प्यायला दिल होतं. व्ही शांताराम हे संध्या यांच्या प्रेमात पडले. सांध्याच्या चेहऱ्यावरील हावभाव त्यांना आकर्षित करत असायचे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Great Indian Kapil Show 4 : कपिल शर्मा ते सुनील ग्रोव्हर, स्टार्सची फी वाचून डोळे होतील पांढरे!
हृतिकसोबत डान्सनंतर सुझानची मुलांसाठी भावनिक पोस्ट, दोघेही गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडसह लग्नात सहभागी!