Mookuthi Amman 2: नयनताराच्या 'मुकुथी अम्मन २- महाशक्ती'चा ट्रेलर रिलीज; ६ नोव्हेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

vivek panmand   | CMS
Published : Oct 21, 2026, 04:11 PM IST
photo

सार

नयनतारा मुख्य भूमिकेत असलेल्या 'मुकुथी अम्मन २- महाशक्ती' या नव्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. सुंदर सी दिग्दर्शित हा चित्रपट येत्या ६ नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये धडकणार आहे.

नयनताराची मुख्य भूमिका असलेल्या 'मुकुथी अम्मन २- महाशक्ती' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधून चित्रपटात सध्याच्या घडामोडी आणि भूतकाळाचा सुरेख मेळ घातल्याचा अंदाज येतोय. नयनतारा या चित्रपटात मुकुथी अम्मन आणि एका पोलीस अधिकाऱ्याच्या अशा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. तर, अभिनेत्री उर्वशीने आईची भूमिका साकारली आहे. सुंदर सी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, हा चित्रपट ६ नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याआधी रिलीज झालेल्या चित्रपटाच्या टीझरलाही प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. 'मुकुथी अम्मन'च्या पहिल्या भागाने जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता दुसऱ्या भागात भक्ती, विनोद आणि सामाजिक संदेश यांचा भन्नाट मेळ पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात नयनतारासोबत दुनिया विजय, रेजिना कॅसांड्रा, उर्वशी, योगी बाबू, मैना नंदिनी, गरुडा राम, अभिनया, श्रुती एस., सिंगमपुली अण्णावी, व्ही.आर. स्वामीनाथन, शिवकुमार एस., सुनील वर्मा इंदुकुरी, वर्षिनी व्यंकट, पाला करुप्पय्या, आनंदा अधिष्ठा लक्ष्मी, नितीन सत्या आणि देबलीना चक्की हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

भव्य सेट्स, डोळे दीपवणारे सीन्स आणि सुंदर सी यांची खास स्टाईल असलेला हा चित्रपट भक्ती, रहस्य आणि मास एंटरटेनमेंटचं परफेक्ट पॅकेज असणार आहे. वेल्स फिल्म्स इंटरनॅशनलच्या बॅनरखाली डॉ. इषारी के. गणेश यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'महाशक्ती'चं लेखन आणि दिग्दर्शन सुंदर सी यांनी केलंय, तर हिप-हॉप तमिझा यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. खुशबू सुंदर, कुश्मिता गणेश, ईशान सक्सेना आणि विघ्नेश शिवन हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तसेच, प्रतीश शेखर हे पीआरओ म्हणून काम पाहत आहेत.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

The Paradise Movie: नानी आणि कीर्ती सुरेशचा भन्नाट डान्स, 'येशनकुला' गाणं रिलीज
Ramayana Movie : ४००० कोटींच्या 'रामायण'चे ॲडव्हान्स बुकिंग सुरू, जगभरात कसा आहे रिस्पॉन्स?