
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरलीये. आपल्या दमदार अभिनयाने, कडक संवादांनी आणि खास देहबोलीने त्यांनी अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अनेकांसाठी ते फक्त एक अभिनेते नव्हते, तर एका बापासारखे, मार्गदर्शकासारखे होते. पण आता त्यांच्या मृत्यूबाबत त्यांनीच पूर्वी केलेली एक भविष्यवाणी खरी ठरलीये का, अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे.
रंगभूमी असो वा सिनेमा, नानांचा अभिनय नेहमीच वरचढ ठरला. त्यांच्या करिअरमधली सर्वात गाजलेली भूमिका म्हणजे 'नटसम्राट' सिनेमातील आप्पासाहेब बेलवलकर. महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा २०१६ मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमात नानांच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं.
पण एक रंजक गोष्ट म्हणजे, नानांनी 'नटसम्राट' हे नाटक करायला स्पष्ट नकार दिला होता. एका मुलाखतीत त्यांनी यामागचं कारणही सांगितलं होतं. नानांच्या मते, रंगभूमीवर 'नटसम्राट' साकारताना प्रत्येक प्रयोगात अभिनेत्याला अक्षरशः आपला जीव ओतावा लागतो. त्यामुळे ही भूमिका वारंवार करण्यासाठी लागणारी शारीरिक आणि मानसिक ताकद आपल्यात नाही, असं ते म्हणाले होते. त्यांची हीच जुनी मुलाखत आता पुन्हा चर्चेत आलीये.
नाना पाटेकर म्हणाले होते, "जेव्हा मला नटसम्राट नाटक विचारण्यात आलं, तेव्हा मी स्पष्ट सांगितलं की मी नाटक करणार नाही, मी सिनेमा करेन. कारण नाटकात प्रत्येक वेळी जर मी तितकाच जीव ओतला, तर मला वाटतं १०, १५ किंवा २५ प्रयोगांनंतर मी नक्कीच मरेन. त्यामुळे मी ते फक्त एकदा सिनेमात केलं."
नानांनी पुढे असंही म्हटलं होतं की, "डॉक्टर लागू असोत, दत्ता भट असोत किंवा आपले... चंद्रकांत गोखले, यशवंत दत्त... ज्या ज्या नटसम्राटांनी हे नाटक केलं, त्या सर्वांचा मृत्यू हार्ट अटॅकनेच झालाय." आता नानांच्या निधनानंतर त्यांचं हे जुनं वक्तव्य पुन्हा व्हायरल होतंय. गोव्यात हार्ट अटॅकनेच नाना पाटेकर यांचं निधन झालं. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. नटसम्राट नाटक केलं तर हार्ट अटॅक येईल, अशी भीती नानांना होती. त्यांनी नाटक तर केलं नाही, पण त्यांच्या मृत्यूचं कारण मात्र हार्ट अटॅकच ठरलं.