Nana Patekar : 45 मिनिटं सतत प्रयत्न करुनही वाचवता आलं नाही, नाना पाटेकरांवर उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले?

Published : Oct 08, 2026, 09:11 AM IST
nana patekar

सार

नाना पाटेकर यांच्या अनपेक्षित निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. या प्रकरणी वैद्यकीय-कायदेशीर नोंद करण्यात आली असून, मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट करण्यासाठी आता त्यांचं शवविच्छेदन केलं जाणार आहे.

पणजी : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेले ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे चित्रपटसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांना त्यांचा जीव वाचवता आला नाही, ४५ मिनिटांपर्यंत सतत त्यांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. गुरुवारी पहाटे ५:२० च्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

नाना पाटेकरांवर उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले?

मनिपाल हॉस्पिटलमधील ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांना तीव्र हृदयविकाराचा झटका (कार्डियाक अरेस्ट) आला होता. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात सुमारे ४५ मिनिटं सतत सीपीआर (CPR) देण्यात आला, परंतु त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि त्यांना पुनरुज्जीवित करता आलं नाही.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणी वैद्यकीय-कायदेशीर प्रकरण (MLC) नोंदवण्यात आलं आहे. नाना पाटेकर यांच्या मृत्यूचं वैद्यकीय कारण निश्चित करण्यासाठी आता शवविच्छेदन केलं जाईल. शवविच्छेदन अहवालानंतरच आता त्यांच्या मृत्यूचं स्पष्ट कारण समोर येईल.

मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराचा झटका (कार्डियाक अरेस्ट) आल्यानंतर नाना पाटेकर यांना त्वरित वैद्यकीय मदत देण्यात आली. डॉक्टरांनी आणि वैद्यकीय पथकाने सुमारे ४५ मिनिटे सतत सीपीआर (CPR) देऊन त्यांचा प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला. तरीही, सर्व प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आलं नाही.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Nana Patekar Death : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, गोव्यात घेतला अखेरचा श्वास
Mithun Chakraborty: मिथुन चक्रवर्तींना पश्चिम बंगाल सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा