
अभिनेता मोहित मलिक आगामी 'Vajr' या स्पिरिचुअल अॅक्शन सिनेमात टायगर श्रॉफच्या विरोधात खलनायकाची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाची निर्मिती महावीर जैन यांनी केली असून, राम माधवानी त्याचे दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने हे दोन्ही अभिनेते पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. एका प्रेस रिलीजनुसार, या प्रोजेक्टचे शूटिंग जपानमध्येही होण्याची शक्यता आहे.
मोहितच्या व्यक्तिरेखेबद्दलचे तपशील सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आले असले, तरी त्याची भूमिका या अॅक्शन एंटरटेनरमधील एक महत्त्वाचा भाग असल्याचे म्हटले जाते. बिरजू लोहारच्या भूमिकेनंतर मोहित या सिनेमातून खलनायकाच्या रुपात एक नवी सुरुवात करताना दिसेल. मोहितच्या एन्ट्रीने 'Vajr' मध्ये एक नवीन रंग भरला जाणार आहे, ज्यात टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहे. आपल्या अॅक्शन भूमिकांसाठी ओळखला जाणारा टायगर पहिल्यांदाच मोहितसोबत स्क्रीन शेअर करणार असल्याने दोघांमधील ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
या घडामोडींशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, “Vajr मध्ये मोहितची व्यक्तिरेखा अतिशय रंजक आहे. तो टायगर श्रॉफच्या विरोधात खलनायकाची भूमिका साकारणार असून, एक अभिनेता म्हणून त्याला वेगळ्या धाटणीची भूमिका एक्सप्लोर करण्याची संधी मिळणार आहे. बिरजू लोहारनंतर ही त्याच्यासाठी आणखी एक वेगळी व्यक्तिरेखा आहे. अॅक्शनने भरलेल्या या सिनेमात मोहित आणि टायगरला पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना पाहणे नक्कीच रंजक ठरेल.”
'Vajr' च्या माध्यमातून मोहित बिरजू लोहारच्या भूमिकेपेक्षा अगदी विरुद्ध भूमिका साकारणार आहे. टायगर श्रॉफच्या विरोधात त्याची खलनायकी भूमिका सिनेमाचा एक महत्त्वाचा पैलू असणार आहे. राम माधवानी यांच्या दिग्दर्शनाखाली अॅक्शनने परिपूर्ण कथा आणि या नव्या जोडीचा थरार प्रेक्षकांना पाहायला मिळेल.