Mike Tyson Netflix : माईक टायसनच्या आयुष्यावरील 'टायसन' डॉक्युसीरिजचा ट्रेलर रिलीज

Published : Sep 18, 2026, 11:15 AM IST
Mike Tyson Netflix : माईक टायसनच्या आयुष्यावरील 'टायसन' डॉक्युसीरिजचा ट्रेलर रिलीज

सार

हेवीवेट बॉक्सर माईक टायसनच्या आयुष्यावरील 'टायसन' या नेटफ्लिक्स डॉक्युसीरिजचा ट्रेलर रिलीज झालाय. १३ ऑक्टोबरला ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येईल. यात त्याचा संघर्ष आणि यश दाखवण्यात आलंय. सोबतच ३ नोव्हेंबरला त्याचा 'रिटर्न ऑफ द माईक' हा कॉमेडी शोसुद्धा येणार आहे.

मुंबई : जगप्रसिद्ध हेवीवेट बॉक्सर माईक टायसनच्या आयुष्यावर आधारित एका नव्या डॉक्युसीरिजचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. 'टायसन' असं या सीरिजचं नाव असून ती १३ ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. एकूण चार भागांच्या या सीरिजमध्ये टायसनचा ब्रुकलिनमधला संघर्ष ते ग्लोबल सुपरस्टार बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आलाय.

सर्वात तरुण हेवीवेट चॅम्पियन बनण्याचं त्याचं यश या सीरिजमध्ये पाहायला मिळेल. पण या यशामागे प्रसिद्धी, पैसा आणि वादांची एक मोठी किनार होती, ज्याने त्याला जवळपास उद्ध्वस्त केलं होतं. टायसनने स्वतःच्या आयुष्यातील चढ-उतार, त्याच्यावर आलेला दबाव आणि घेतलेले निर्णय यावर अगदी मोकळेपणाने भाष्य केलंय. 'टायसन' ही सीरिज त्याच्या यशाची, पडझडीची आणि पुन्हा उभं राहण्याची एक दमदार गोष्ट आहे, असं या सीरिजच्या अधिकृत माहितीत म्हटलंय.

या ट्रेलरमध्ये माईक टायसन स्वतःच्या यशाबद्दल, पडझडीबद्दल आणि बॉक्सिंग रिंगमधील कमबॅकवर बोलताना दिसतोय. यासोबतच त्याच्या काही जुन्या आणि गाजलेल्या बॉक्सिंग मॅचेसचे जुने व्हिडिओसुद्धा यात पाहायला मिळतात.

नेटफ्लिक्सने गुरुवारी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर हा ट्रेलर शेअर केलाय.

'रिटर्न ऑफ द माईक' कॉमेडी स्पेशल

या डॉक्युसीरिजसोबतच टायसनच्या 'माईक टायसन: रिटर्न ऑफ द माईक' या वन-मॅन कॉमेडी शोचीही घोषणा करण्यात आलीय. हा शो ३ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवरच रिलीज होईल. यात टायसनचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळणार आहे. तो स्वतःच्याच आयुष्यातील गोंधळावर आणि चुकांवर जोक्स करताना दिसेल. त्याची कॉमेडी टायमिंग यात जबरदस्त असल्याचं बोललं जातंय.

"तुम्ही टायसनला याआधी कधीही अशा रूपात पाहिलं नसेल. तो एकदम अनफिल्टर्ड आणि खळखळून हसवणारा आहे. जगातला सर्वात खतरनाक माणूस तितकाच मजेशीरही असू शकतो, हे यातून सिद्ध होतं," असं या शोच्या वर्णनात म्हटलंय.

'माईक टायसन: रिटर्न ऑफ द माईक' या शोचं दिग्दर्शन किकी टायसनने केलंय. फ्लोरिडामधील हॉलिवूड इथल्या सेमिनोल हार्ड रॉक हॉटेल अँड कॅसिनोमध्ये याचं शूटिंग झालंय. माईक, किकी आणि मार्क लिबरमन हे या शोचे कार्यकारी निर्माते आहेत. तर 'टायसन' डॉक्युसीरिजचं दिग्दर्शन फ्लॉयड रस यांनी केलं असून जेन्ना मिलमन, जेकब मिलर आणि अलेक्सा गिन्सबर्ग यांनी याची निर्मिती केलीय.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Kajol Durga Puja : लाल-सोनेरी साडीत काजोलचा जलवा, मुखर्जी कुटुंबाच्या दुर्गा पूजेचे पाहा खास फोटोज
Jailer 2 Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'जेलर 2'ची धूम, पहिल्याच दिवशी रजनीकांत यांची सेंच्युरी!