Gondhal : ‘गोंधळ’च्या स्पेशल स्क्रीनिंगला प्रेक्षकांचा महागोंधळ, ३०० सीट्सच्या थिएटरमध्ये ६५० हून अधिक प्रेक्षक

Published : Aug 25, 2026, 11:13 PM ISTUpdated : Aug 25, 2026, 11:14 PM IST
Gondhal Marathi Movie

सार

Gondhal Marathi Movie Special Screening : गोंधळ सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग पुण्यात पार पडलं. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. ‘फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्हड’ अनेकांना सिनेमा न पाहताच परत जावं लागलं.

पुणे : पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या ‘गोंधळ’च्या स्पेशल स्क्रीनिंगला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक संघटना फिप्रेस्की (दि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स) यांच्या वतीने या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आलं होतं. ‘फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्हड’ पद्धतीने प्रवेश देण्यात आलेल्या या स्क्रीनिंगसाठी महाराष्ट्राच्या विविध भागांतून प्रेक्षक पुण्यात दाखल झाले होते.

नगर, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, सांगली यांसह विविध ठिकाणांहून आलेल्या प्रेक्षकांनी चित्रपट पाहाण्यासाठी मोठी गर्दी केली. थिएटरची आसनक्षमता सुमारे ३०० असताना तब्बल ६५० हून अधिक प्रेक्षक उपस्थित राहिल्याने थिएटरबाहेरही मोठी गर्दी झाली. वाढलेल्या गर्दीमुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सुमारे ८० ते ९० प्रेक्षकांना जागेअभावी नाराज होऊन परतावं लागलं. यावेळी सिक्युरिटीसोबत वादावादीही झाली. मात्र फिप्रेस्कीचे सदस्य नरेंद्र आणि त्यांच्या टीमने मध्यस्थी करत परिस्थिती शांततेत हाताळली.

या सगळ्या गोंधळातही ‘गोंधळ’चं स्पेशल स्क्रीनिंग यशस्वीपणे पार पडलं. विशेष म्हणजे अभिनेता जितेंद्र जोशी यांच्यासह काही कलाकारांनीही यावेळी उपस्थित राहून चित्रपटाचा आनंद घेतला. स्क्रीनिंगनंतर प्रेक्षकांकडून चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून ‘गोंधळ’ पुन्हा प्रदर्शित करावा, अशी मागणीही अनेक प्रेक्षकांनी केली.

या सगळ्या प्रकरणाबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणाले, “दूरदूरहून येऊनही काही प्रेक्षकांना ‘गोंधळ’ पाहाता आला नाही, याबद्दल आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. ज्या प्रेक्षकांना चित्रपट पाहता आला नाही, त्यांच्यासाठी पुन्हा स्क्रीनिंग आयोजित करण्याचं आम्ही आश्वासन देतो. ‘गोंधळ’च्या रिरिलीजचाही आम्ही विचार करत आहोत आणि लवकरच आम्ही प्रेक्षकांना आनंदाची बातमी देऊ.”

फिप्रेस्कीचे अध्यक्ष प्रेम मुजुमदार म्हणाले, “इतक्या मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपट पाहाण्यासाठी आले, हा निश्चितच आनंदाचा क्षण आहे. मात्र, जागेअभावी काही प्रेक्षकांना चित्रपट पाहाता आला नाही, याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. प्रेक्षकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद ‘गोंधळ’ला मिळणाऱ्या प्रेमाची पावती आहे.”

दरम्यान, मराठीतील हा चित्रपट आता केवळ मराठीपुरता मर्यादित न राहाता तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ‘गोंधळ’ची ही बहुभाषिक सफर आता प्रेक्षकांसाठी आणखी खास ठरणार आहे.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Kareena Kapoor : सिंगापूर F1 ग्रांप्रीमध्ये करीनाच्या 'या' बॅगची एकच चर्चा; किंमत ऐकून थक्क व्हाल
Hanuman Ansh Box Office : फक्त 2 कोटींचं बजेट, 'हनुमान अंश'ने 66 दिवसांत कमावले 446 कोटी