Kiara Advani : कियारा आणि सिद्धार्थ पुन्हा होणार आई-बाबा, लेक सारायासोबत शेअर केली गोड बातमी

Published : Oct 07, 2026, 11:38 AM IST
Kiara Advani : कियारा आणि सिद्धार्थ पुन्हा होणार आई-बाबा, लेक सारायासोबत शेअर केली गोड बातमी

सार

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा एकदा आई-बाबा होणार आहेत. या जोडप्याने सोशल मीडियावर एक गोड फोटो शेअर करत त्यांच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

मुंबई : कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी सोशल मीडियावर त्यांच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची घोषणा करत चाहत्यांचा दिवस खास बनवला आहे. पहिल्या प्रेग्नेंसीच्या वेळी जसा फोटो शेअर केला होता, तसाच एक गोड फोटो त्यांनी यावेळीही पोस्ट केलाय. पण यावेळी आनंद दुप्पट आहे, कारण त्यांची चिमुकली लेक साराया हिनेही या सेलिब्रेशनमध्ये सहभाग घेतलाय.

कियारा-सिद्धार्थची दुसऱ्या प्रेग्नेंसीची घोषणा

पांढऱ्या रंगाच्या विणलेल्या सॉक्सचा एक गोड फोटो शेअर करण्यात आलाय. यात चिमुकल्या सारायाचा हातही दिसत आहे. हा फोटो शेअर करताना कियाराने लिहिलंय, "सर्वांत मोठी देणगी आम्हाला पुन्हा एकदा मिळाली आहे. आमचं मन प्रेम आणि कृतज्ञतेने भरून आलंय." तुम्हीही पाहा हा गोड फोटो!

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Kiara Advani : कियारा आडवाणी - सिद्धार्थ मल्होत्राचं 90 कोटींचं आलिशान घर पाहिलंत का?
Vidyut Jammwal Hollywood Debut : १५ मिनिटे श्वास रोखून धरला! हॉलिवूड पदार्पणातच विद्युतची कमाल