Katrina Kaif : कतरिना कैफवर बॉडी शेमिंगची टीका, अभिनेत्रीच्या सपोर्टमध्ये कोण आलंय माहितीये?

Published : Sep 17, 2026, 03:11 PM IST

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफला सध्या सोशल मीडियावर भयंकर ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. तिच्या वाढलेल्या वजनावरून लोक तिला बॉडी शेम करत आहेत. पण आता कतरिनाच्या सपोर्टमध्ये तिचे चाहते आणि अनेक सेलिब्रिटी मैदानात उतरले आहेत.

PREV
14
अनेक दशके बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री

कतरिना कैफने आपल्या डान्स आणि ग्लॅमरच्या जोरावर अनेक दशके बॉलिवूडवर राज्य केलंय. पण सध्या सोशल मीडियावर तिच्याबद्दल सुरू असलेली चर्चा आणि बॉडी शेमिंगचा प्रकार संतापजनक आहे. आई झाल्यानंतर तिच्या शरीरात झालेले नैसर्गिक बदल पाहून काही लोक अत्यंत घाणेरड्या कमेंट्स करत आहेत. मात्र, तिचे चाहते आणि अनेक सेलिब्रिटी या निगेटिव्हिटीला जोरदार प्रत्युत्तर देत आहेत.

24
पब्लिक अपिअरन्सवरून सुरू झाला वाद

नुकतंच प्रसिद्ध उद्योगपती अंबानी यांच्या घरी झालेल्या गणेश चतुर्थीच्या कार्यक्रमात कतरिना तिचा नवरा विकी कौशलसोबत दिसली होती. आई झाल्यानंतर ती खूप कमी वेळा पब्लिक इव्हेंटमध्ये दिसली आहे. त्यामुळे तिचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाले. पण तिचं वाढलेलं वजन पाहून काही युजर्सनी तिचे जुने आणि आताचे फोटो एकत्र करून तिची खिल्ली उडवायला सुरुवात केली. तिच्या जुन्या आयटम साँग्सचे फोटो वापरून लोक तिला बॉडी शेम करत आहेत.

34
कतरिनाच्या सपोर्टमध्ये आले चाहते

या ट्रोलिंगवर कतरिनाचे चाहते आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. बाळाला जन्म दिल्यानंतर एका महिलेच्या शरीरात आणि चेहऱ्यात नैसर्गिक बदल होणं ही खूप सामान्य गोष्ट आहे. एका आईचं शरीर पूर्ववत व्हायला वेळ लागतो, आणि त्याची खिल्ली उडवणं हे विकृत मानसिकतेचं लक्षण आहे, असं चाहते म्हणत आहेत.

शिवालिका ओबेरॉयसारख्या अभिनेत्रींनी या ट्रोलर्सना चांगलंच फटकारलंय. महिलांच्या दिसण्यावरून समाजाने लावलेले दुटप्पी निकष तिने खोडून काढले. "फक्त लूक्समध्ये बदल झाला म्हणून एका अभिनेत्रीचं करिअर संपलं असं म्हणणं मूर्खपणाचं आहे. ती आज १०० कोटींच्या बिझनेसची मालकीण आहे, मातृत्वाचा आनंद घेतेय आणि पुन्हा सिनेमात कमबॅक करण्याची तयारी करतेय," असं सडेतोड उत्तर नेटकऱ्यांनी टीकाकारांना दिलंय.

44
महिलांबाबत नेटकऱ्यांचा दुटप्पीपणा

या घटनेमुळे सोशल मीडियावर अभिनेत्रींना ज्या प्रकारे टार्गेट केलं जातं, त्या दुटप्पीपणावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. याआधी दीपिका पदुकोण गरोदर असताना "ती प्रेग्नन्सीचं नाटक करतेय" असा आरोप लोकांनी केला होता. आणि आता कतरिनाचं नैसर्गिकरित्या वजन वाढलं तर त्यावरही लोक टीका करत आहेत. पण या सगळ्यातून एकच गोष्ट सिद्ध होते की, सिनेमातल्या ग्लॅमरपेक्षा मातृत्व, आत्मविश्वास आणि स्वाभिमान खूप मोठा असतो. कतरिनाच्या पाठीशी आज तिचे चाहते खंबीरपणे उभे आहेत.

Read more Photos on

Recommended Stories