जुई गडकरीवर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या 'या' व्यक्तीचं झालं निधन

Published : Nov 09, 2025, 11:40 AM IST
Jui Gadkari

सार

अभिनेत्री जुई गडकरीच्या लाडक्या आजोबांचे निधन झाले आहे, ज्यामुळे तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जुई तिच्या आजोबांना 'आण्णू' या नावाने हाक मारत असे आणि त्यांचे नाते खूप घट्ट होते. 

अभिनेत्री जुई गडकरीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या आजोबांचं निधन झालं असून तिला अकाली दुःख झालं आहे. ती या प्रकरणामुळे चर्चेत आली असून आता त्यामुळं इंडस्ट्रीवर दुःखाचं सावट कोसळलं आहे. तीच तिच्या आजोबांसोबत एकदम घट्ट नातं होतं.

आजोबांना कोणत्या नावाने हाक मारत असायची? 

आजोबांना जुई ही आण्णू या नावाने हाक मारत असायची. जुई गडकरी सध्या 'ठरलं तर मग' या टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत आजीची भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्रीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर या अभिनेत्रीचा मृत्यू झाला होता.

लाडकी आजीचा झाला होता मृत्यू 

लाडकी पूर्णा आजीचा मृत्यू झाला होता. तिने या आजीसाठी खास अशी पोस्ट सोशल मीडियावर लिहिल्याचं दिसून आलं. यावेळी ती भावुक झाल्याचं दिसून आलं होतं. जुई गडकरीचे वडील नाटककार आणि तालवादक आहेत. तर ती राम गणेश गडकरी यांची पणती आहे. आता जुई गडकरी मालिकेत काम करणार का नाही हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

टेलिव्हिजनवर करणार राज्य 

टेलिव्हिजनवर यावेळी जुई गडकरी ही राज्य करणार असल्याचं दिसून येणार आहे. ही मालिका टीआरपीच्या बाबतीत क्रमांक एकवर असून जुई आता त्यातच काम करणार आहे. जुई गडकरी ही मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'पुढचं पाऊल' या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

एका बिल्डिंगच्या किंमतीएवढी गाडी विकी कौशलने केली खरेदी, किंमत वाचून बघाल आभाळाकडे
Dhurandhar X Review : अ‍ॅक्शन पॅक्ड, मास एंटरटेनर.. 'धुरंधर' पाहून प्रेक्षक काय म्हणाले?