जयप्रदा यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीचा एक किस्सा शेअर केलाय. एका शूटिंगदरम्यान दिग्दर्शकाने बिकिनी घालायला सांगितल्यावर त्या सेटवरच रडल्या होत्या. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे ३० वर्षांच्या करिअरमध्ये कधीच असे कपडे घातले नाहीत.
ज्येष्ठ अभिनेत्री आणि राजकारणी जयप्रदा यांनी त्यांच्या ३० वर्षांच्या प्रदीर्घ सिने आणि राजकीय प्रवासातील अनेक रंजक किस्से शेअर केले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी दिग्गज अभिनेते शोभन बाबू यांच्यासोबतचं नातं, ज्युनियर एनटीआरबद्दलचा आदर, दिग्दर्शक दासरी नारायण राव यांच्यासोबतचे अनुभव आणि एनटीआर यांच्या सांगण्यावरून राजकारणात कशी एन्ट्री घेतली, यावर मनमोकळ्या गप्पा मारल्या.
24
बिकिनी घालण्यास नकार
जयप्रदा यांनी त्यांच्या तत्त्वांविषयी सांगितलं. "मी इंडस्ट्रीत नवीन असताना दिग्दर्शक दासरी नारायण राव यांच्या सिनेमात एका स्विमिंग पूल सीनसाठी मला बिकिनी घालायला सांगितली होती. तेव्हा मी खूप लहान होते. मी स्पष्ट नकार दिला आणि सेटवरच रडायला लागले. दासरी यांनी माझी अडचण समजून घेतली आणि बिकिनीऐवजी मला पाण्यात एका मोठ्या रबरी टायरमध्ये बसवून तो सीन शूट केला. त्या एका निर्णयामुळे मी माझ्या ३० वर्षांच्या करिअरमध्ये कधीच तोकडे कपडे घातले नाहीत," असं त्या म्हणाल्या.
34
सुजाता सिनेमा आजही जवळचा - जयाप्रदा
दिवंगत अभिनेते शोभन बाबू प्रेमाने आपल्याला 'अत्ता' (आत्या) म्हणायचे, अशी आठवण जयप्रदा यांनी सांगितली. "सेटवर ते फक्त वरवरची चौकशी न करता मला घरच्या सदस्यासारखी वागणूक द्यायचे," असं त्या म्हणाल्या. ज्युनियर एनटीआर हा सुद्धा मोठ्यांचा आदर करणारा अभिनेता असल्याचं त्यांनी कौतुक केलं. के. बालचंदर यांचा 'सुजाता' हा सिनेमा त्यांच्या खूप जवळचा असून, आजही त्यातील गाणी ऐकली की डोळ्यांत पाणी येतं, असं त्यांनी सांगितलं.
राजकीय प्रवासाबद्दल बोलताना जयप्रदा म्हणाल्या, "सिनिअर एनटीआर हेच माझ्या राजकीय प्रवासाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांची सत्ता गेल्यावर ते अडचणीत होते, तेव्हा मी बंगळुरूमध्ये शूटिंग करत होते. पहाटे ५ वाजता त्यांच्या ऑफिसमधून फोन आला. संध्याकाळी मी त्यांना भेटायला गेले, तेव्हा लवकर झोपण्याची सवय असूनही ते माझ्यासाठी उठून आले. त्यांच्या सांगण्यावरूनच मी तेलुगू देसम पार्टीत (TDP) प्रवेश केला. एनटीआर यांच्या चैतन्य रथम बस यात्रा आणि २ रुपये किलो तांदूळ योजनेचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. त्याच प्रेरणेने मी उत्तर प्रदेशातील रामपूरमधून एकटीने लढून खासदार म्हणून निवडून आले."
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.