नवऱ्यानं अभिनेत्री पत्नीच्या चारित्र्यावर घेतला संशय, चाकू हल्ला करून डोकं भिंतीला जोरात आपटलं, पोलिसांनी आरोपीला केली अटक

Published : Jul 13, 2025, 08:09 AM ISTUpdated : Jul 13, 2025, 08:16 AM IST
manjula shruti

सार

कन्नड अभिनेत्री मंजुळा श्रुती हिच्यावर तिच्या पतीनेच चाकूने हल्ला केला. वैवाहिक मतभेदातून हा हल्ला झाल्याचे वृत्त आहे. अभिनेत्रीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बंगळुरू: सिनेइंडस्ट्रीत कधी काय होईल सांगता येत नाही. साऊथ इंडस्ट्रीमधून अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कन्नड अभिनेत्री मंजुळा श्रुती हिच्यावर तिच्या पतीनेच तिच्यावर चाकूने हल्ला केला. या महिन्याच्या सुरुवातीलाच पत्नी आपल्याला फसवून बंगळुरू येथे राहत असल्याच्या आरोपावरून त्यानं तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. अभिनेत्रीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

वैवाहिक मतभेद असल्यामुळं होत होती भांडण 

अमृतधरे या प्रसिद्ध मालिकेत या अभिनेत्रीने काम केलं होतं. तिने रिक्षाचालकासोबत प्रेम विवाह केला होता आणि दोघांना दोन मुले होती. दोघांमध्ये वैवाहिक मतभेद असल्यामुळे कायमच भांडण होत असत. त्यांची भांडण वाढत जाऊन टोकाच्या पातळीवर जात असत. श्रुती तिच्या पतीपासून तीन महिन्यांपासून वेगळी झाली आणि तिने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पत्नीवर घेतला संशय 

काही वर्षांपूर्वी अमरेश आणि श्रुती दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांचे लग्न २० वर्षांपूर्वी झाले होते. पण सुखी संसारात विघ्न पडलं आणि दोघांमध्ये वैवाहिक मतभेद व्हायला सुरुवात झाली. हे मतभेद एवढे वाढले की त्यांच्यात भांडण होत असायची. मागील गुरुवारीच दोघे परत एकदा एकत्र आले होते.

एकत्र आल्यानंतर पतीने केले चाकूने वार 

गुरुवारी एकत्र आल्यानंतर दोघांचा सुखी संसार परत सुरु होतो का अशी आशा निर्माण झाली होती. पण अमरेशने मुले शाळेत गेल्यानंतर त्याच्या पत्नीवर हल्ला केला. या हल्यात ती गंभीर जखमी झाली. अमरेशने प्रथम पेपर स्प्रे वापरला आणि नंतर तिच्या खांद्यावर, मांडी आणि मानेवर अनेक वेळा वार केले आणि तिचे डोकेसुद्धा भिंतीवर आदळले.

पतीला पोलिसांनी केली अटक 

पोलिसांनी यासंदर्भातील अधिक माहिती दिली आहे. त्यांनी बोलताना म्हटलं आहे की, या घटनेनंतर त्यांच्या शेजारचे तिथे आले, त्यांनी भांडण थांबवले आणि तिला व्हिक्टोरिया रुग्णालयात दाखल केले. हनुमंतनगर पोलीस स्टेशनमध्ये पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

700 कोटींची मालकीण अभिनेत्री, 10 वर्षांनी लहान मुलाशी केले लग्न, वाचा बेडरुम सिक्रेट?
10 भाषांमध्ये 90 चित्रपट, पण 50 वर्षांनीही सर्वांना आवडणारी अविवाहित अभिनेत्री कोण?