सलमान खानने एका ब्लॉकबस्टर चित्रपटाला नकार दिला आणि तिथूनच शाहरुख खानच्या करिअरला कलाटणी मिळाली. सलमानच्या एका 'नो' मुळे शाहरुखची रेंजच बदलून गेली. काय आहे हा भन्नाट किस्सा?
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आज त्याचा ६१ वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या ३४ वर्षांपासून तो भारतीय सिनेसृष्टीत सुपरस्टार म्हणून राज्य करत आहे. बॉलिवूडमध्ये कितीही हिरो असले तरी सलमान आणि शाहरुखच्या मैत्रीची नेहमीच चर्चा होते.
पण शाहरुख आज ज्या लेव्हलचा सुपरस्टार आहे, त्यामागे सलमान खानची एक मोठी मदत आहे, हे फार कमी लोकांना माहितीये. होय, हे अगदी खरंय. शाहरुखचं करिअर पूर्णपणे बदलून टाकणारा तो किस्सा नेमका काय आहे, ते आपण सविस्तर जाणून घेऊया.
25
पहिला मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट मिळवून सलमानचाच मोठा वाटा
करिअरच्या सुरुवातीला सलमान खानच्या कुटुंबाने आपल्याला खूप सपोर्ट केल्याचं शाहरुखने अनेकदा सांगितलंय. फक्त वैयक्तिक आयुष्यातच नाही, तर शाहरुखला त्याच्या करिअरमधला पहिला मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट मिळवून देण्यातही सलमानचाच मोठा वाटा होता.
ही गोष्ट आहे १९९३ मध्ये आलेल्या 'बाजीगर' चित्रपटाची. अब्बास-मस्तान जोडीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. यात हिरोचं पात्र थोडं निगेटिव्ह शेड असलेलं होतं. अजय शर्मा नावाच्या या अँटी-हिरोची भूमिका करणं त्या काळात कोणत्याही नव्या हिरोसाठी खूप मोठी रिस्क होती.
35
सलमानने दिग्दर्शकांना सुचवलेला शाहरुखचा चेहरा
अब्बास-मस्तान यांनी बाजीगरची स्क्रिप्ट सर्वात आधी सलमान खानला ऐकवली होती. पण त्यावेळी निगेटिव्ह शेड असलेली भूमिका करायला सलमानने स्पष्ट नकार दिला.
एवढंच नाही तर, "ही भूमिका शाहरुख खानला एकदम परफेक्ट सूट होईल, तुम्ही एकदा त्याला भेटा," असा सल्लाही सलमानने दिग्दर्शकांना दिला. सलमानची ही आयडिया दिग्दर्शकांना आवडली आणि त्यांनी शाहरुखला अप्रोच केलं. शाहरुखनेही हे चॅलेंज आनंदाने स्वीकारलं आणि या चित्रपटात काम केलं.
'दिवाना' चित्रपटातून शाहरुखने ग्रँड एंट्री घेतली होती, पण सोलो हिरो म्हणून त्याला एका मोठ्या कमर्शियल हिटची गरज होती. नेमक्या त्याच वेळी 'बाजीगर'च्या रूपाने त्याला तो हिट मिळाला.
चित्रपट रिलीज झाल्यावर थिएटरमध्ये अक्षरशः धुमाकूळ उडाला. शाहरुखने आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावलं. रातोरात शाहरुख खान एक मोठा सुपरस्टार झाला. हा चित्रपट त्याच्या करिअरमधला सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरला.
55
सलमानने नाकारलेल्या सिनेमाने शाहरुखचं नशीब पालटलं
आयएमडीबीच्या (IMDb) रिपोर्टनुसार, त्याकाळी बाजीगर चित्रपट फक्त ४ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला होता. पण रिलीज झाल्यावर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत तब्बल ३२ कोटी रुपये गल्ला जमवला.
गुंतवलेल्या बजेटच्या तब्बल ८ पट नफा या चित्रपटाने मिळवून दिला. अशा प्रकारे सलमान खानने नाकारलेल्या एका चित्रपटाने शाहरुख खानचं नशीबच बदलून टाकलं आणि त्याला बॉलिवूडचा 'किंग खान' बनवलं.
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.