बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला मृत्यूचा सामना, किस्सा वाचून नशीबवान शब्दाचा समजेल अर्थ

Published : Nov 09, 2025, 10:30 AM IST

अभिनेत्री रश्मीका मंदाना आणि श्रद्धा दास यांनी एका विमान अपघाताचा थरारक अनुभव शेअर केला आहे. मुंबईहून हैदराबादला जात असताना तांत्रिक बिघाडामुळे त्यांच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले, ज्यात त्या दोघी थोडक्यात बचावल्या. 

PREV
16
बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला मृत्यूचा सामना, किस्सा वाचून नशीबवान शब्दाचा समजेल अर्थ

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्रीतील अभिनेत्रींना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. यातच काही दिवसांपूर्वी रश्मीका मंदाना हिला एका अपघातातून जावे लागल्याचा अनुभव तिने शेअर केला.

26
कोणत्या अपघाताचा करावा लागला सामना?

रश्मीका मंदाना हिला एका अपघाताचा सामना करावा लागला. त्या अपघातातून ती थोडक्यात बचावली. यावेळी तिच्यासोबत श्रद्धा दास ही अभिनेत्री होती, त्या मुंबईहून हैदराबादला प्रवास करत असताना विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले.

36
अपघातातून थोडक्यात वाचल्या

श्रद्धा दास आणि रश्मीका मंदाना या दोघी अपघातातून थोडक्यात वाचली. त्या मुंबईहून हैदराबादला जाणाऱ्या विमानाने जात होत्या पण ते विमान क्रॅश होणार होते. त्यावेळ मृत्यू अगदी जवळून पाहिल्याचे श्रद्धाने सांगितले.

46
श्रद्धा दास काय म्हणाली?

“रश्मिका आणि मला एकत्र असा अनुभव आला जिथे आमचे विमान जवळजवळ क्रॅश झालेले. ती आमची पहिली भेट होती. ती खूप गोड व्यक्ती आहे.”, असं श्रद्धा म्हणाली आहे.

56
रश्मीका काय म्हणाली?

रश्मीका आणि श्रद्धा या दोघींनी या घडलेल्या घटनेचा उल्लेख केला आहे. त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे की, "तुमच्या माहितीसाठी, आज आम्ही अशा प्रकारे मृत्यूपासून वाचलो."

66
ही घटना कधी घडली होती?

ही घटना २०२४ मध्ये घडल्याची माहिती दोघींनी दिली आहे. मुंबईहून हैदराबादला जाणारे एअर विस्ताराचे विमान तांत्रिक कारणांमुळे 30 मिनिटांनी मुंबईत परतावे लागले.

Read more Photos on

Recommended Stories