लावणीमुळे प्रसिद्ध झालेली गौतमी पाटील तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. तिचा पहिला पगार ५०० रुपये होता, पण आज ती एका कार्यक्रमासाठी ३ ते ५ लाख रुपये घेते. तिच्या टीमची महिन्याची कमाई ४५ ते ५० लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.
मराठी इंडस्ट्रीत गौतमी करते सर्वात जास्त कमाई, आकडा वाचून फुटेल घाम
गौतमी पाटील महिन्याला लाखो रुपये कमावते. पुण्यामध्ये झालेल्या अपघातावरून ती परत एकदा चर्चेत आली आहे. आपण ती एकूण किती कमावते हे जाणून घेऊयात.
27
गौतमी पाटीलची तरुणांमध्ये क्रेझ
गौतमी पाटीलची तरुणांमध्ये क्रेझ झाली आहे. लोकांची तुफान गर्दी जमवून तिने मोठ्या प्रमाणावर ख्याती मिळवली आहे. पुण्यात झालेल्या अपघाताच्या प्रकरणामुळे ती परत एकदा चर्चेत आली होती.
37
गौतमी लावणीसाठी खासकरून प्रसिद्ध
गौतमी तिच्या लावणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तिचे कार्यक्रम महाराष्ट्रभर होत असतात, तिच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. ती किती पैसे कमावते याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
गौतमीचा जन्म १९९६ साली झाला. ती एका गरीब कुटुंबात जन्माला आली होती. लहान असताना गौतमीला तिच्या वडिलांनी सोडून दिल. लहानपणी ती तिची आई दोघेही कामानिमित्त पुण्याला आले होते.
57
गौतमीचा पगार किती होता?
गौतमीचा पहिला पगार हा ५०० रुपये होता. आवाज ती दर महिन्याला लाखो रुपये कमावत असते. दहीहंडीत तिने चांगली कमाई केली असून ती महिन्याला लाखो रुपये कमवत असते.
67
दहीहंडीच्या कार्यक्रमाला किती रुपये घेतले?
दहीहंडीच्या एका कार्यक्रमाला गौतमीने ३ ते ५ लाख रुपये घेतले होते. तिची टीम महिन्याला ४५ ते ५० लाख रुपये कमवत असल्याचं सांगण्यात आलं आहे. गौतमी जिथं कार्यक्रम करते तिथे चांगले पैसे कमावते.
77
आधी किती मानधन घेत होती?
आधी गौतमी ही १ ते ३ लाख रुपयांच्या दरम्यान मानधन घेत असायची. आता ती प्रचंड लोकप्रिय असून महाराष्ट्रभर गर्दी होत असते. गौतमीने स्वतः चांगली पैशांची कमाई केली आहे.