Hanuman Ansh: २ कोटींचा सिनेमा, १०० कोटींच्या क्लबजवळ! बॉक्स ऑफिसवर 'महाराज जीं'चा चमत्कार

vivek panmand   | CMS
Published : Sep 06, 2026, 04:00 PM IST
Hanuman Ansh: २ कोटींचा सिनेमा, १०० कोटींच्या क्लबजवळ! बॉक्स ऑफिसवर 'महाराज जीं'चा चमत्कार

सार

फक्त २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला 'हनुमान अंश' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. यशच्या 'टॉक्सिक' आणि 'मिर्झापूर: द मूव्ही' सारख्या मोठ्या सिनेमांना हा चित्रपट टक्कर देत असून, आता १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यापासून काही पावलं दूर आहे.

Neem Karoli Baba Biopic-Hanuman Ansh Box Office Collection- २ कोटींचं बजेट.. १०० कोटींचा क्लब! 'हनुमान अंश'ने बॉक्स ऑफिसवर घडवला चमत्कार!

सिनेमाच्या जगात कधी काय होईल, याचा नेम नसतो. कधी कोट्यवधी रुपये आणि मोठे स्टार्स असूनही सिनेमे बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटतात, तर कधी अगदीच कमी बजेटचा सिनेमा अख्ख्या इंडस्ट्रीला आपल्याकडे बघायला भाग पाडतो. सध्या असाच एक चमत्कार घडलाय, आणि त्या सिनेमाचं नाव आहे 'हनुमान अंश'!

सुरुवात संथ, पण आता सुसाट वेग!

७ ऑगस्टला जेव्हा हा सिनेमा रिलीज झाला, तेव्हा तो एवढा मोठा धमाका करेल असं कुणालाच वाटलं नव्हतं. पहिल्या आठवड्यात सिनेमाने फक्त १.०८ कोटी रुपये कमावले, तर दुसऱ्या आठवड्यात कमाई ४० लाखांवर आली. पण, इथूनच खरा खेळ सुरू झाला! लोकांनी एकमेकांना सांगून (माऊथ पब्लिसिटी) या सिनेमाला अक्षरशः उचलून धरलं. तिसऱ्या आठवड्यात सिनेमाने थेट १०.४० कोटींचा गल्ला जमवला आणि चौथ्या आठवड्यात तर तब्बल ६१ कोटी रुपये कमावून सगळ्यांची गणितं चुकवली!

१०० कोटींच्या उंबरठ्यावर 'महाराज जी' महिमा!

विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित या सिनेमाने फक्त एका महिन्यात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या ३० व्या दिवशी सिनेमाच्या कमाईत तब्बल ६२.५ टक्क्यांची वाढ झाली. एकाच दिवसात १६.२५ कोटी रुपये कमावून या सिनेमाने मोठ्या स्टार्सच्या सिनेमांनाही घाम फोडलाय. सध्या या सिनेमाने भारतात ९९.१३ कोटी रुपयांची नेट कमाई केली असून, १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेण्यासाठी फक्त काही लाखांची गरज आहे. तर दुसरीकडे, सिनेमाचं ग्रॉस कलेक्शन आधीच ११७ कोटींच्या पुढे गेलं आहे!

काय आहे 'हनुमान अंश'ची कथा?

भक्त ज्यांना 'महाराज जी' म्हणून ओळखतात, त्या नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आणि शिकवणीवर हा सिनेमा आधारलेला आहे. आपल्या आईला भेटण्यासाठी देवाला शोधायला निघालेला एक लहान मुलगा, कसा पुढे जाऊन नीम करोली बाबा बनतो आणि 'जनसेवा हीच ईश्वरसेवा' मानतो, हे शोभिनव सत्य यांनी आपल्या जबरदस्त अभिनयातून पडद्यावर साकारलं आहे. ही भक्ती आणि श्रद्धेची कहाणी आता तरुण आणि वयस्कर अशा सगळ्याच प्रेक्षकांना थिएटरकडे खेचत आहे.

मोठ्या सिनेमांनाही देतोय टक्कर!

विशेष म्हणजे, फक्त २ कोटींच्या बजेटचा हा सिनेमा आज यशच्या 'टॉक्सिक' आणि 'मिर्झापूर: द मूव्ही' सारख्या मोठ्या सिनेमांना तगडी स्पर्धा देत आहे. सुरुवातीला एक छोटीशी ठिणगी वाटणारा हा सिनेमा आता बॉक्स ऑफिसवर वणव्यासारखा पसरला आहे. हा फक्त एका सिनेमाचा विजय नाही, तर चांगला विषय (कंटेंट) आणि विश्वास असेल तर काहीही शक्य आहे, याचा हा पुरावा आहे. सध्या तरी नीम करोली बाबांची ही जीवनगाथा थिएटरमध्ये रेकॉर्डवर रेकॉर्ड बनवत सुसाट निघाली आहे!

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Malaika Arora : अर्जुननंतर १९ वर्षांनी लहान हिरे व्यापाऱ्याच्या प्रेमात? मलायका पुन्हा चर्चेत
Gautami patil | गौतमी पाटील हिने पाठीवर काय लिहिलंय, स्वत: दाखवलं Dahi Handi Mumbai