गोविंदांच्या आयुष्यातील ‘ती’ कोण? विमानतळावरील व्हिडिओनंतर चर्चांना उधाण

Published : Aug 11, 2026, 01:49 PM IST
Who Is Komal Rani Swarnakar

सार

गोविंदा आणि अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार यांना मुंबई विमानतळावर एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्या कथित रिलेशनशिपच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

मुंबई : अभिनेता गोविंदा गेल्या काही काळापासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी सुनीता आहुजा यांच्या वक्तव्यांनंतर आता गोविंदा आणि अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार यांच्या कथित नात्याच्या चर्चा रंगल्या आहेत. नुकतेच त्या दोघांना मुंबई विमानतळावर एकत्रित स्पॉट करण्यात आले. मात्र, गोविंदा किंवा कोमल यांनी त्यांच्या नात्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही. दरम्यान, कोमल राणी स्वर्णकार नक्की कोण याबद्दल जाणून घेऊया.

कोण आहे कोमल राणी स्वर्णकार?

कोमल राणी स्वर्णकार हिंदी चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण करण्याच्या तयारीत आहे. गोविंदा यांच्या आगामी ‘रूपा’ या चित्रपटाशी कोमल राणी स्वर्णकार झळकणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, कोमल ही उत्तर प्रदेशातील असल्याचे सांगितले जाते. मात्र कोमलचे शिक्षण, फॅमिली आणि वैयक्तिक आयुष्याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही.

गोविंदा आणि कोमलच्या नात्याची चर्चा

नुकतेच गोविंदा आणि कोमलला मुंबई विमानतळावर एकत्र स्पॉट करण्यात आले. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. यानंतर गोविंदा आणि कोमल झाल्यानंतर रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये गोविंदा आणि कोमल गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या दाव्याला दोघांकडूनही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

गोविंदा-कोमलच्या चर्चांवर सुनीता आहुजांची प्रतिक्रिया

गोविंदा आणि कोमल यांना एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्या कथित नात्याबाबत सुनीता आहुजा यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर सुनीता अहुजा यांनी गोविंदांवर टीका केल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. सुनीता आणि गोविंदा यांनी वर्ष 1987 मध्ये लग्न केले. या दोघांना टीना आहुजा आणि यशवर्धन अशी दोन मुले आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Rajkummar Rao House : असं दिसतं राजकुमार रावचं ४४ कोटींचं घर; थायलंडहून आणलेली बुद्धमूर्ती खास आकर्षण
Amaal Mallik: 'आवारापन २'च्या गाण्यावरून वाद, वडील डबू मलिक मुलाच्या पाठीशी; म्हणाले 'Proud Father'