'क्रू' चित्रपटाच्या माध्यमातून तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेनन पहिल्यांदाच एकत्र

Published : Mar 17, 2024, 10:19 AM ISTUpdated : Mar 17, 2024, 10:26 AM IST
crew film trailer launched

सार

द क्रू' चित्रपट बऱ्याच प्रतीक्षेनंतर २९ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात तब्बू करीन कपूर खान आणि कीर्ती सेनन असून यांचा धमाकेदार अभिनय पाहायला मिळणार आहे.

एंटरटेनमेंट डेस्क : मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या 'द क्रू' चित्रपटाची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहत होत,अखेर ती प्रतीक्षा आता संपली आहे. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपूर्वी 'द क्रू' या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर रिलीज करण्यात आला होता. या माध्यमातून छोटीशी झलक प्रेक्षकांना पाहता आली होती. यामुळे आणखीनच उत्सुकता शिगेला पोहोचली होती. या चित्रपटात तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेनन पहिल्यांदाच एकत्र दिसणार असून 'द क्रू' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेननसह दिलजीत दोसाझची एक दमदार झलक ट्रेलरमध्ये दिसली आहे.

या चित्रपटात बेशुद्ध प्रवासी आणि त्यांनी लपवलेली सोन्याची बिस्किटे सापडतात आणि अधिकारी म्हणतो, ‘सोनं कुठे आहे? या संवादानंतर या तिघीही गोधळात पडतात. गदारोळ आणि गोंधळात सुरु असलेला प्रवास यात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात कोहिनूर नावाची एक विमान कंपनी आहे, जिच्याभोवती चित्रपटाची कथा मांडण्यात आली आहे.

या ट्रेलरमध्ये दिसते की,तब्बूला समजत कि त्यांची कंपनी दिवाळखोर झाली आहे. तर, त्या तिघींच्याही आयुष्यात आपापले संघर्ष आहेत.विशेष म्हणजे त्या तिघींमधील अंडरस्टॅण्डिंग खूप सुंदर पद्धतीने मांडण्यात आली आहे. दरम्यान, त्यांना एक प्रवाशी भेटतो, जो मृत असून त्याच्याकडे सोन्याची बिस्किटे आहेत. इथून कथेत ट्विस्ट येतो. आपली सगळी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी, त्या या व्यक्तीकडचे सोने चोरायचे ठरवतात. कस्टम अधिकारी म्हणून दिलजीत दोसांझची एन्ट्री झाल्यानंतर कथेत नवा ट्विस्ट येणार आहे. तर, कॉमेडियन कपिल शर्माची भूमिकाही खूप महत्त्वाची असल्याचे दिसते आहे. एकूणच, ‘द क्रू’चा ट्रेलर एक पूर्ण मनोरंजन पॅकेज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे. तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेनन या चोरीतून सुटू शकतील का? हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळणार आहे. हे त्रिकूट चित्रपटगृहांमध्ये खळबळ उडवून देणार आहे. या चित्रपटात तिघीही एअर होस्टेसच्या भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेलरमधून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, तिन्ही स्टार्सच्या दमदार अभिनयासोबतच धमाकेदार कॉमेडी देखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 'द क्रू' हा चित्रपट २९ मार्चला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!