बीग बाॅस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादवला साप विष प्रकरणी नोएडा पोलिसांनी केली अटक....

सापाचे विष मनोरंजनासाठी, औषध म्हणून वापरण्याच्या प्रकरणात एल्विश यादव सह आणखी सहा जणांना अटक करण्यात आली होती.त्या प्रकणाच्या पुढील तपास पोलिस सध्या करत आहेत.

rohan salodkar | Published : Mar 17, 2024 3:05 PM IST / Updated: Mar 17 2024, 08:40 PM IST

 

नोएडा ः यूट्यूबर आणि बीग बा्ॅस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादवला रविवारी सापाच्या विषाप्रकरणी नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या वर्षी 3 नोव्हेंबरला नोएडा सेक्टर 49 पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये यादव सह सहा जणांचा समावेश होता.

पोलिस अधिकार्यांच्या म्हणण्यानूसार, इतर पाच आरोपींना अटक करण्यात आली होती, परंतु सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. यादव यांच्यावर नोएडा येथील एका संशयित रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष दिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी पार्टीत सापाच्या विषाचा मनोरंजनासाठी औषध म्हणून वापर केल्याच्या संशयावरून तपास सुरू केला. त्याला ग्रेटर नोएडातील सूरजपूर जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

एल्विश यादव आणि इतर पाच जणांवर वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 च्या तरतुदीनुसार आरोप लावण्यात आले होते. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 120 ब अंतर्गत गुन्हेगारी कट रचल्याचा आरोपही करण्यात आला होता. नंतर हे प्रकरण तपासासाठी सेक्टर 49 मधून सेक्टर 20 पोलीस ठाण्यात हलवण्यात आले.

नोएडाचे अतिरिक्त डीसीपी मनीष मिश्रा एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सेक्टर 20 पोलिस स्टेशनच्या पथकाने आरोपीला अटक केली असून यापूर्वीही या प्रकरणाबाबत पोलिसांनी त्यांची चौकशी केली होती. यादववर करण्यात आलेल्या आरोपांचे त्यानी खंडन केले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसर्या दिवशीच सोशल मिडीयावर याचा खुलासा करत निर्दोष असल्याचे सांगितले होते. त्यामध्ये त्यांने सांगितले की मी पोलिसांना सहकार्य करण्यास तयार आहे.

या प्रकरणातील उल्लेखणीय बाब म्हणजे एफआयआर नोंदविलेल्या स्थानिक सेक्टर 49 पोलीस ठाण्याचे प्रभारी असलेले उपनिरीक्षक यांना प्रकरणापासून दूर करण्यात आले आहे. प्राणी हक्क गट पीपल फॉर अॅनिमल्स (पीएफए) च्या अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

3 नोव्हेंबर रोजी सेक्टर 51 मधील बँक्वेट हॉलमधून पाच जणांना अटक करण्यात आली होती आणि त्यांच्या ताब्यातून पाच कोब्रासह नऊ सापांची सुटका करण्यात आली होती, तर 20 मिली संशयित सापाचे विषही जप्त करण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की यूट्यूबर पार्टी हॉलमध्ये उपस्थित नव्हता. मात्र त्यांची सापाचे विष मनोरंजनासाठी, औषध म्हणून वापरण्याच्या प्रकरणात त्याची भूमिकेचा तपास करत आहेत. पीएफएच्या अध्यक्षा आणि भाजप नेत्या मनेका गांधी यांनी यादव यांच्यावर सापाचे विष बेकायदेशीरपणे विकल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखीण काही खुलासे समोर येणार आहेत का हे पाहाणे महत्वाचे ठरेल.

Share this article