
एली अवरामवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. तिच्या आजीचं निधन झालं आहे. याची माहिती एलीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून दिली. एलीने आजीचे फोटो शेअर करत ३१ ऑगस्ट रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं सांगितलं. एलीने आजीसोबत घालवलेल्या सुंदर क्षणांना उजाळा देत भावनिक पोस्ट लिहिली.
एलीने लिहिलं, ‘देवा, तुमच्या आत्म्यास शांती लाभो. आजी-आजोबांसोबत वाढणं माझ्यासाठी आशीर्वादापेक्षा कमी नव्हतं. या जगात माझ्या आजीचा प्रवास आता संपला आहे. ही बातमी ऐकून माझं मन खूप दुखावलं आहे, पण आता त्या आजोबांना (पापो) भेटल्या असतील हे जाणून मला थोडं समाधान वाटतं. लहानपणापासून आतापर्यंत त्यांच्यासोबत घालवलेले सुंदर क्षण मी फक्त आठवू शकते. त्यांचं विनोदबुद्धी खूपच मजेदार होतं आणि आमच्या स्वयंपाकघरातील गप्पा नेहमीच अंतहीन असायच्या. तुम्ही अनेकांनी त्यांना माझ्या इंस्टा स्टोरीवर पाहिलं असेल. मात्र, डिमेंशियामुळे त्या सगळं विसरू लागल्या होत्या. गुड बॉय आजी. ओम शांती.’
एली अवराम मूळची स्वीडन-ग्रीक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. २०१३ साली आलेल्या 'बिग बॉस ७'मुळे तिला खरी ओळख मिळाली. त्यानंतर तिने टीव्ही रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा ७'मध्येही भाग घेतला. दरम्यान, एलीने 'मिकी व्हायरस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर एलीने मागे वळून पाहिलं नाही. 'उंगली', 'किस किसको प्यार करूं', 'वन नाइट स्टँड', 'गुडबॉय', 'नाम शबाना', 'पोस्टर बॉयज' अशा चित्रपटांमध्ये तिने काम केलं. एलीला शेवटचं 'कॉन्ज्युरिंग कन्नप्पन' या चित्रपटात पाहिलं गेलं. अद्याप तिने आपल्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही.
आशिष चंचलानी आणि एली या दोघांचा एक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. या फोटोमध्ये आशिषने एलीला उचलून घेतल्याचं दिसत असून त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण दोघांनी एकत्र एका गाण्यामध्ये काम केलं असून त्यांच्या गाण्याच्या प्रमोशनसाठी हे शूट केल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर या फोटोवर प्रेक्षकांनी मजेदार कमेंट केल्या होत्या.