Dharmendra Family Tree Know About His Wives and Children : धर्मेंद्र यांचं २४ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. धर्मेंद्र यांच्या पश्चात त्यांचं मोठं कुटुंब आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या कुटुंबात कोण-कोण आहे आणि कोण काय करतं.
चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी धर्मेंद्र यांचं लग्न प्रकाश कौर यांच्याशी झालं होतं. त्यावेळी ते फक्त १९ वर्षांचे होते. प्रकाश लाइमलाइटपासून दूर राहतात. या लग्नापासून त्यांना सनी, बॉबी, विजेता आणि अजीता ही चार मुलं झाली.
28
हेमा मालिनी
चित्रपटांमध्ये आल्यानंतर धर्मेंद्र यांचं मन प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यावर जडलं. पण धर्मेंद्र आधीच विवाहित होते. त्यामुळे त्यांनी धर्म बदलून हेमा यांच्याशी लग्न केलं.
38
सनी देओल
धर्मेंद्र यांचा मोठा मुलगा सनी देओल एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याचं लग्न पूजा देओलशी झालं आहे. त्यांना करण आणि राजवीर असे दोन मुलगे आहेत. करणने २०२३ मध्ये दिशाशी लग्न केलं. तर राजवीर अभिनयात नशीब आजमावत आहे.
बॉबी देओलच्या पत्नीचं नाव तान्या देओल आहे. त्यांना आर्यमन आणि धरम असे दोन मुलगे आहेत. दोघेही लाइमलाइटपासून दूर राहणंच पसंत करतात.
58
विजेता देओल
विजेता देओलच्या पतीचं नाव विवेक गिल आहे. त्यांना साहिल नावाचा मुलगा आणि प्रेरणा नावाची मुलगी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते दिल्लीत राहतात.
68
अजीता देओल
अजीता देओल आपल्या कुटुंबासोबत अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये राहते. ती तिथे एका शाळेत शिकवते. तिच्या पतीचं नाव किरण चौधरी आहे. या जोडप्याला निकिता आणि प्रियांका नावाच्या दोन मुली आहेत.
78
ईशा देओल
अभिनेत्री ईशा देओलचं लग्न भरत तख्तानीसोबत झालं होतं, पण २०२४ मध्ये ते वेगळे झाले. या जोडप्याला दोन मुली आहेत, ज्यांचा ते मिळून सांभाळ करत आहेत.
88
अहाना देओल
अहाना देओल लाइमलाइटपासून दूर राहते. अहानाचं लग्न २०१४ मध्ये व्यावसायिक वैभव वोहरासोबत झालं. या जोडप्याला ३ मुलं आहेत, ज्यात दोन जुळ्या मुली आणि एक मुलगा आहे.