Bigg Boss Marathi 6 : 'पॉवर की'चा गेम अन् तन्वीचा आगाऊपणा! पहिल्याच आठवड्यात 'हे' ९ स्पर्धक आले डेंजर झोनमध्ये

Published : Jan 14, 2026, 10:52 PM IST

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी ६च्या घरात पॉवर की टास्कमुळे समीकरणं बदलली आहेत. या टास्कमुळे तन्वीला कॅप्टनसीची उमेदवारी मिळाली, तर करण, दीपाली आणि रुचिता थेट नॉमिनेट झाले. यानंतर झालेल्या नॉमिनेशनमध्ये ९ सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नामांकित झाले.

PREV
15
'पॉवर की'चा गेम अन् तन्वीचा आगाऊपणा!

मुंबई : 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात पहिल्याच आठवड्यात वादाची ठिणगी पडली आहे. कॅप्टनसी आणि नॉमिनेशन टास्कमुळे घरातील समीकरणं पूर्णपणे बदलली असून, मैत्रीत फूट आणि शब्दांची चकमक पाहायला मिळत आहे. आजच्या भागात 'पॉवर की'च्या जोरावर काही सदस्यांनी बाजी मारली, तर काहींच्या नशिबी थेट नॉमिनेशन आलं. 

25
'पॉवर चेंबर'ने पलटला खेळ

बिग बॉसने 'पॉवर की' असलेल्या सदस्यांना (दीपाली, सोनाली, रुचिता, तन्वी, करण आणि प्राजक्ता) पॉवर चेंबरमध्ये जाण्याची संधी दिली. या चेंबरमध्ये 'कॅप्टनसीची उमेदवारी' आणि 'इम्युनिटी' (सुरक्षा कवच) मिळवण्यासाठी चुरस रंगली.

तन्वी वि. दीपाली: तन्वीने चपळाईने बझर दाबून कॅप्टनसीची दावेदारी मिळवली, तर दीपाली थेट नॉमिनेट झाली.

प्राजक्ता वि. करण: प्राजक्ताने बाजी मारत करणला नॉमिनेशनच्या खाईत लोटले.

रुचिताची घोडचूक: रुचिताने तिची 'पॉवर की' बेजबाबदारपणे स्विमिंग पूलपाशी ठेवली, जी करणने लपवली. परिणामी, रुचिताला आपली पॉवर गमवावी लागली आणि ती थेट नॉमिनेट झाली. यावरून रुचिता आणि सोनालीमध्ये जोरदार भांडण झाले. 

35
पतंग टास्क आणि नॉमिनेशनचा थरार

ज्यांच्याकडे इम्युनिटी होती, अशा तन्वी, प्राजक्ता आणि सोनालीला इतरांना नॉमिनेट करण्याचे अधिकार मिळाले.

प्राजक्ता: प्रभू आणि अनुश्रीला नॉमिनेट केले.

तन्वी: दिव्या आणि सागरला नॉमिनेट केले. यावेळी सागर आणि तन्वीमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

सोनाली: राधा आणि रोशनच्या नावाची पाटी पतंगावरून कापून त्यांना नॉमिनेट केले. 

45
पहिल्या आठवड्यातील 'नॉमिनेटेड' सदस्य

या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी एकूण ९ स्पर्धक नामांकित झाले आहेत. प्रभू, अनुश्री, दिव्या, सागर, राधा, रोशन, करण, दीपाली आणि रुचिता. 

55
तन्वीची प्राजक्तावर मिश्किल टीका?

दिवसभराच्या तणावानंतर तन्वीने प्राजक्ताची नक्कल करत थोडा आगाऊपणा केला, ज्यामुळे घरात पुन्हा एकदा कुजबुज सुरू झाली. दुसरीकडे, करणने आपल्या आई-वडिलांच्या संघर्षाची कहाणी सांगून घरच्यांना भावूक केले, तर सचिनने बिग बॉसची नक्कल करत वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories