Bigg Boss Marathi 6 : कोणता मोह रुचिताला पडणार भारी? दोघींचे चेहरे का पडले? अरे हे असे कसे घडले?

Published : Jan 14, 2026, 10:20 AM IST

Bigg Boss Marathi 6 : कलर्स मराठीवरील 'बिग बॉस मराठी'च्या घराचा दरवाजा उघडून आता जेमतेम तीन दिवस उलटले आहेत, पण वादाची ठिणगी मात्र पहिल्याच दिवसापासून पडली आहे. घरात रणनीती आखताना सदस्य दिसून येत आहेत. वाचा काय घडले…

PREV
17
दडपण वाढतंय

पहिल्या दिवशी तन्वीसोबत झालेला राडा आणि त्यानंतर प्रभू शेळकेसोबत झालेली खडाजंगी यांमुळे रुचिता जामदार सध्या घराच्या केंद्रस्थानी आहे. अशातच आता समोर आलेल्या एका नव्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

27
अशी मिळणार कलाटणी

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, बिग बॉसच्या घरातील खेळाला कलाटणी देणारी 'पॉवर की' (Power Key) एका विशिष्ट टास्कदरम्यान महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे.

37
काय आहे पॉवर की

बिग बॉस रुचिताला सांगताना दिसत आहेत पॉवर चेंबरमध्ये येण्यासाठी पॉवर की गरजेची आहे. मात्र, या 'पॉवर की' चा वापर करताना रुचिताकडून काहीतरी मोठी चूक घडल्याचे संकेत मिळत आहेत.

47
रुचिता संकटात सापडणार

"पॉवर की ला हलक्यात घेणं, पडलं रुचिताला भारी!" आणि आता हेच तिच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. ही पॉवर की रुचिताला वाचवणार की तिला थेट अडचणीत टाकणार?

57
पॉवर की ची मोहिनी

या चुकीमुळे तिला घरातील कामांची शिक्षा मिळणार की नॉमिनेशनमध्ये जावं लागणार, हे पाहणं रंजक ठरेल. करणने पॉवर key देण्यास नकार दिला, बिग बॉस यांना सांग पॉवर key करणने घेतली आहे.

67
कुणी मागितली माफी

रुचिता त्याच्या पाया पडताना, त्याची माफी मागताना दिसत आहे. बघूया आता पुढे काय घडणार, आजच्या बिग बॉस मराठीच्या भागात.

77
आजचा भाग बघा

रितेश देशमुखच्या 'लयभारी' स्टाईलमध्ये सुरू झालेला हा सीझन आता हळूहळू 'डेंजर' वळण घेऊ लागला आहे. आज रात्री ८ वाजता कलर्स मराठीवर आणि कधीही JioHotstar वर.

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories