Bigg Boss Marathi 6: चाहत्यांची प्रतीक्षा संपली! हिंदी बिग बॉस संपताच मराठी आवृत्तीचा धमाकेदार सीझन सुरू

Published : Nov 24, 2025, 10:15 PM IST
Bigg Boss Marathi 6 announcement

सार

कलर्स मराठीने 'Bigg Boss Marathi 6' ची अधिकृत घोषणा केली असून, 'मनोरंजनाचे नवे दरवाजे' या संकल्पनेसह पहिला टीझर प्रदर्शित केला आहे. या नव्या पर्वाचा होस्ट कोण असणार, रितेश देशमुख की महेश मांजरेकर, यावर चर्चा सुरू आहे. 

Bigg Boss Marathi 6 च्या चाहत्यांसाठी अखेर मोठी खुशखबर आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेली चर्चा, चाहत्यांचे अंदाज आणि प्रोमोतील इशारे हे सगळं खरे ठरत कलर्स मराठीने सहाव्या पर्वाची अधिकृत घोषणा केली आहे. नव्या पर्वाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला असून, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

कलर्स मराठीचा धमाकेदार टीझर, ‘मनोरंजनाचे नवे दरवाजे’ उघडणार!

"स्वागतासाठी व्हा तयार, कारण लवकरच उघडणार आहे मनोरंजनाचे दार" या आकर्षक कॅप्शनसह कलर्स मराठीने प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला. या टीझरमध्ये अनेक दरवाज्यांचा संकेत दिल्याने चर्चा तापल्या आहेत.

यंदा घरात वेगवेगळे झोन्स असतील का?

की नवीन ट्विस्टसह गेमिंगचा फॉर्मॅट बदलणार?

थीम काय असणार?

हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आता अक्षरशः आतुर झाले आहेत.

 

 

होस्ट कोण? रितेश देशमुख की महेश मांजरेकर?

या सीझनमधील सर्वात मोठा प्रश्न कायम आहे.

या पर्वाचे सूत्रसंचालन कोण करणार?

रितेश देशमुख यांनी परत येत ‘भाऊचा कट्टा’ जिवंत ठेवणार का?

की पुन्हा एकदा महेश मांजरेकर यांनाच जबाबदारी मिळणार?

कलर्स मराठीने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नसल्याने चाहत्यांमध्ये यावर मोठी चर्चा सुरू आहे.

Bigg Boss Marathi 6 कुठे पाहता येणार?

हा सीझन कलर्स मराठीवर आणि JioHotstar वर उपलब्ध होईल. टीव्ही आणि OTT दोन्ही प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना हा शो पाहता येणार आहे.

हिंदी बिग बॉसनंतर लगेच मराठी बिग बॉस?

सध्या प्रेक्षक Hindi Bigg Boss 19 मध्ये गुंतले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार

7 डिसेंबरला हिंदी बिग बॉसचा ग्रँड फिनाले होणार.

म्हणूनच अंदाज व्यक्त केला जातोय की हिंदी सीझन संपताच बिग बॉस मराठी 6 सुरू होईल.

चाहत्यांच्या उत्सुकतेला आता मिळणार उत्तर

नव्या घराचे सेट, अनोखे दरवाजे, ताजे चेहरे, दमदार स्पर्धा आणि मनोरंजनाची मेजवानी Bigg Boss Marathi 6 हा सीझन नक्कीच अधिक रंगतदार ठरणार आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

सुंदर कविता आणि रचना अपूर्ण राहिल्या, हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल केला पश्चाताप
हे कोण लोक? घाणेरडी पॅन्ट, हातात मोबाईल; पापाराझींवर बरसल्या जया बच्चन